#COVID19 : रुग्णालयांमध्ये अत्यावशक्‍य शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या...वैद्यकीय सेवेवर परिणाम 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

सुदैवाने कोरोनाचा एकही रुग्ण नाशिक मध्ये आढळला नसला तरी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून आपत्कालिन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विलगिकरण (आयसोलेशन) व अलगीकरण (क्वारोंटाईन) कक्षाची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत नाशिक शहरात कोरोना शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या 287 पर्यंत पोहोचली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली आहे.

नाशिक : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागु केल्याने त्याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील ओपीडी बंद करण्यापाठोपाठ अत्यावशक्‍य शस्त्रक्रिया वगळता पेन किलरद्वारे दुखणे लांबणीवर पाडता येवू शकतील अशा शस्त्रक्रिया किमान पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

यंत्रणा सतर्क
सुदैवाने कोरोनाचा एकही रुग्ण नाशिक मध्ये आढळला नसला तरी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिस प्रशासनाकडून आपत्कालिन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विलगिकरण (आयसोलेशन) व अलगीकरण (क्वारोंटाईन) कक्षाची स्थापना करण्यात आली असून आतापर्यंत नाशिक शहरात कोरोना शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या 287 पर्यंत पोहोचली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली आहे.

पेन किलर देवून किंवा प्लान्ट शस्त्रक्रिया पुढे

दरम्यान शहरातील साडे पाचशे खासगी रुग्णालयातील अतिमहत्वाच्या शस्त्रक्रिया वगळता पेन किलर देवून किंवा प्लान्ट शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एखाद्या रुग्णावर फारचं मोठी व अति तातडीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास त्यासाठीचं रुग्ण दाखल करून घेतले जात आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनने त्यासंदर्भात सुचना दिल्या असून ऍण्टी बायोटीक देवून शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

शहरातील रुग्णालयांची स्थिती 
- खासगी रुग्णालये -550 
- शासकीय रुग्णालये- 4 महापालिकेचे, 1 संदर्भ, जिल्हाशासकीय रुग्णालय व ईएसआय हॉस्पिटल. 
- महापालिकेचे शहरी आरोग्य केंद्रे- 30 
- एकुण खाटांची संख्या- सुमारे साडे चार हजार. 
 
आयएमए च्या सुचनेनुसार प्लान्ट शस्त्रक्रिया ऍण्टी बायोटीक देवून 15 ते 20 दिवस लांबणीवर टाकता येवू शकतात त्यामुळे अशा शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या असून अत्यावशक्‍य शस्त्रक्रियेसाठी मात्र रुग्ण दाखल करून घेतले जात आहे.- डॉ. आवेश पलोड, माजी अध्यक्ष, आयएमए. 

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extreme surgeries in hospitals were also postponed due to corona virus Nashik Marathi News