पहाटेचा थरार! पोलिसांचा संशय बळावताच सुरु झाला सिनेस्टाईलने पाठलाग; अखेर त्यांनी डाव साधलाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

ताहाराबादकडून भरधाव वाहनाने दगडगोट्यावर धडक देत सुसाट वेगाने मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे सदर वाहन पलटी होता होता वाचले होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तरूणांनी विरगाव गावापर्यंत वाहनांचा सिनेस्टाईलने पाठलाग सुरू केला मात्र अपयशी ठरले. 

नाशिक : (अंबासन) बागलाण तालुक्यातील घटना...पोलिसांना भनक लागली होतीच. युवकांनीही कामात खारीचा वाटा दिला. पोलिसांनी वाहनाचा पाठलागही केला. मात्र रस्त्यातील दगडगोटे ओलांडत त्यांनी धुम ठोकलीच. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

बागलाण तालुक्यातील करंजाड येथील विंचूर प्रकाशा महामार्गावर शुक्रवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास अवैद्यरित्या जनावरे वाहतूक करणारे वाहन जात असल्याची गुप्त माहिती जायखेडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी करंजाड येथील सामाजिक कार्यकर्ते केवळ देवरे यांना भ्रमणधनीवर माहीती वाहनांची माहिती दिली. पोलिसांनी शासकीय वाहनातून अवैद्यरित्या जनावरे वाहतूक करणारे वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग सुरू केला. दरम्यान श्री. देवरे यांनी तातडीने बबन देवरे, गणेश पवार, पप्पू पवार व पंकज खैरनार यांना घेऊन करंजाड रस्त्यावर सदर वाहन अडविण्यासाठी दगडगोटे टाकले. ताहाराबादकडून भरधाव वेगाने जनावरे वाहतूक करणारे वाहनाने दगडगोट्यावर धडक देत सुसाट वेगाने मार्गस्थ झाले. विशेष म्हणजे सदर वाहन पलटी होता होता वाचले होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तरूणांनी विरगाव गावापर्यंत वाहनांचा सिनेस्टाईलने पाठलाग सुरू केला मात्र अपयशी ठरले. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

या अवैद्यरित्या जणावरे घेऊन जाणा-या वाहनांवर वरदहस्त कुणाचा याबाबत चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावर दगडगोटे टाकून अडविण्याचा प्रयत्न केला. तरीही सुसाट वेगाने रस्त्यावरील दगडगोट्यावरून वाहन चालवून फरार झाले. पोलिस प्रशासनाने कठोरपणे कार्यवाही करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Failure of police to seize vehicles transporting animals illegally nashik marathi news