मद्यधुंदीत 'तो' रोज शेतमजुरावर माज करायचा...एके दिवशी दारूच्या नशेत केली हद्दच पार 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

हरणगाव येथील रहिवासी असलेले संबंधित मुलगा व देवराम लक्ष्मण शेखरे हे दोघेही शेतमजूर असून, ते ओणे शिवारातील वेताळबाबा चौफुलीजवळ मुक्कामास आहेत. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे ते मजुरी करायचे. गेल्या मंगळवारी (ता. 19) रात्री जेवणानंतर देवराम शेखरे हे शेताजवळच फिरत होते. त्यावेळी घडला धक्कादायक प्रकार...

नाशिक / कसबे सुकेणे : हरणगाव येथील रहिवासी असलेले संबंधित मुलगा व देवराम लक्ष्मण शेखरे हे दोघेही शेतमजूर असून, ते ओणे शिवारातील वेताळबाबा चौफुलीजवळ मुक्कामास आहेत. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे ते मजुरी करायचे. गेल्या मंगळवारी (ता. 19) रात्री जेवणानंतर देवराम शेखरे हे शेताजवळच फिरत होते. त्यावेळी घडला धक्कादायक प्रकार...

असा घडला प्रकार...

हरणगाव (ता. पेठ) येथील रहिवासी असलेले संबंधित मुलगा (वय 14.6) व देवराम लक्ष्मण शेखरे (वय 48) हे दोघेही शेतमजूर असून, सध्या ते ओणे शिवारातील वेताळबाबा चौफुलीजवळ मुक्कामास आहेत. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे ते मजुरी करतात. गेल्या मंगळवारी (ता. 19) रात्री जेवणानंतर देवराम शेखरे हे शेताजवळच फिरत होते. त्यावेळी नशेत असलेल्या या मुलाने त्यांच्या डोक्‍यात काहीतरी टनक वस्तू जोरात मारली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप देवराम यांची पत्नी विमल शेखरे (वय 45) यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विमल शेखरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा गेल्या एक महिन्यापासून नेहमी सायंकाळी दारू पिऊन येत असे व आमच्या संपूर्ण परिवाराला शिवीगाळ करत असे. तो अल्पवयीन असल्याने देवराम यांनी त्याची अनेक वेळा समजूत काढली. त्यामुळे त्याच्या वागण्यात बदल तर झाला नाहीच; उलट मृत देवराम शेखरे यांच्याविषयी सूडाची भावना निर्माण झाली व त्यातूनच त्याने त्यांचा खून केला. तसेच आपल्यालादेखील ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओझरचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कवडे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

संबंधित मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत शेजारी राहणाऱ्या शेतमजुराचा खून केल्याची घटना ओणे (ता. निफाड) येथे उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farm laborer murder From drunken minor child nashik marathi news