esakal | अल्पभूधारक बापाच्या कष्टाला 'लेकी'कडून यशाची झालर...वाचा फोटोमागच्या जिद्दीची कहाणी!
sakal

बोलून बातमी शोधा

sakshi.jpg

शेतकऱ्याच्या नशिबी सततच्या हालअपेष्टा... त्यातच शेतमजुरीच्या परिस्थितीत जगताना लेकीला शिक्षण देणाऱ्या अल्पभूधारक बापाच्या कष्टाला लेकीने यशाची झालर चढविली आहे. सावकारवाडी (ता. मालेगाव) येथील साक्षी भाऊसाहेब साळुंखे हिने बारावी विज्ञान शाखेतून ७९ टक्के गुण मिळविले आहे.

अल्पभूधारक बापाच्या कष्टाला 'लेकी'कडून यशाची झालर...वाचा फोटोमागच्या जिद्दीची कहाणी!

sakal_logo
By
राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव कॅम्प) शेतकऱ्याच्या नशिबी सततच्या हालअपेष्टा... त्यातच शेतमजुरीच्या परिस्थितीत जगताना लेकीला शिक्षण देणाऱ्या अल्पभूधारक बापाच्या कष्टाला लेकीने यशाची झालर चढविली आहे. सावकारवाडी (ता. मालेगाव) येथील साक्षी भाऊसाहेब साळुंखे हिने बारावी विज्ञान शाखेतून ७९ टक्के गुण मिळविले आहे.

साळुंखे दांपत्याचे लेकीला शिक्षणासाठी पाठबळ

सावकारवाडी (ता. मालेगाव) येथील साक्षी भाऊसाहेब साळुंखे हिने बारावी विज्ञान शाखेतून ७९ टक्के गुण मिळविले. पुढे औषधनिर्माणशास्त्र शाखेतून एम.फॉर्मसीचे शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याच्या स्वप्नांचा पाठलाग साक्षी करते आहे. अल्पभूधारक शेतकरी असल्याने उत्पन्न तसे मर्यादितच होते. तरीही साळुंखे दांपत्याने आपल्या लेकीला शिक्षणासाठी पाठबळ दिले. सावकारवाडी ते शिरसोंडी हा सात किलोमीटर दुहेरी प्रवास सायकलने करून साक्षी स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज गाठायची. परिस्थिती हलाखीची असल्याने दहावीचे शिक्षण मामांकडे खालप येथे घेतले. दहावीत ८४ टक्के मिळवत हुशारीची चुणूक आई-वडिलांना सुखद होती. आता बारावीतही घवघवीत यश मिळविल्याने आई-वडिलांचा आनंद द्विगुणित झालाय. एकटीच लेक असलेल्या श्री. साळुंखे यांनी मुलीच्या इच्छेप्रमाणे पुढील शिक्षणासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी असल्याचे सांगितले.

हेही वाचा > अखेर जिल्ह्यात 'हा' पर्याय वापरुन भातांच्या रोपांची लागवड...वाचा सविस्तर बातमी

सतत प्रयत्न करण्याची तयारी असली, की ध्येय गाठता येते. कष्ट व परिश्रमाने मिळविलेले यश आनंददायी असते. आई-वडिलांच्या कष्ट व संघर्षाची आठवण खरी प्रेरणा ठरते. सर्व शिक्षक व महाविद्यालयाच्या प्रेरणेने यश मिळाले. पदव्युत्तर शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांतून अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. - साक्षी साळुंखे

हेही वाचा > धक्कादायक! खासगी रुग्णालयांकडून कोविड उपचारात अनियमितता... कारवाईची शक्यता

go to top