esakal | आयडियाची कल्पना! खपली गव्हापासून शेतकऱ्याने बनवली आरोग्यवर्धक बिस्किटे; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

biscuits.jpg

बाजारभावाचा उतरता आलेख पाहून शेतीचे अर्थकारण कोलमडले यातून काहीतरी मार्ग काढण्याच्या उद्देशाने अर्ध्या एकरात मधुमेहींसाठी खपली गव्हाची लागवड केली. आलेल्या उत्पादनातून बिस्किटे तयार करण्याची कल्पना सुचली. यातून घरच्या सेंद्रिय उसापासूनचा सेंद्रिय गूळ आणि खपली गहू यापासून बिस्किटे तयार केली. 

आयडियाची कल्पना! खपली गव्हापासून शेतकऱ्याने बनवली आरोग्यवर्धक बिस्किटे; वाचा सविस्तर

sakal_logo
By
माणिक देसाई

नाशिक : (निफाड) वाढत्या रासायनिक खतांचा मारा, घसरणारा जमिनीचा पोत अन्‌ बिघडणारे शेतीचे अर्थकारण अशा प्राप्त परिस्थितीशी दोन हात करीत शेतीलाच करिअर म्हणून निवडत अक्षय नवले या शेतकऱ्याने विषमुक्त शेती फुलवत भरघोस उत्पन्न मिळविण्याची किमया साधली आहे. त्याने आपल्या शेतातील खपली गव्हापासून आरोग्यवर्धक बिस्किटे बनविली आहेत. वाचा सविस्तर

सेंद्रिय मालापासून स्वनिर्मित उत्पादन 

निफाड येथील अक्षय नवले व कुटुंबीय वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. मात्र प्रयोगशील तंत्रज्ञानाद्वारे नवनवीन प्रयोग शेतीत करताना असा अनुभव आला की कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत असताना रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरून जमिनीचा पोत खराब होत आहे. शिवाय पीक हातात येईपर्यंत अमाप पैसा खर्च होतो आणि रासायनिक खतांचा वापर केल्याने उत्पन्न फारसे निघत नाही, बाजारभावाचा उतरता आलेख पाहून शेतीचे अर्थकारण कोलमडले यातून काहीतरी मार्ग काढण्याच्या उद्देशाने अर्ध्या एकरात मधुमेहींसाठी खपली गव्हाची लागवड केली. आलेल्या उत्पादनातून बिस्किटे तयार करण्याची कल्पना सुचली. यातून घरच्या सेंद्रिय उसापासूनचा सेंद्रिय गूळ आणि खपली गहू यापासून बिस्किटे तयार केली. 

आरोग्यवर्धक बिस्किट 

ही बिस्किटे मधुमेहींसाठी उपयुक्त असून, बद्धकोष्ठता, शारीरिक व्याधींवर गुणकारी असल्याचे नवले यांनी सांगितले. गेल्या आठ वर्षांपासून नवले निफाड परिसरातील आठवडेबाजारात सेंद्रिय उत्पादन घेऊन निफाडकरांना विषमुक्त शेतमाल विक्री करत असून, त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. दर रविवारी ते नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथे आपला सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला माल विकत असल्याचे नवले कुटुंबीयांनी सांगितले. 

शेत न नांगरता भरघोस उत्पादन 

श्री. नवले यांनी एक दाणादेखील रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने जनावरांचे शेण, गोमूत्र आणि पालापाचोळा वापरून तयार करण्यात आलेले खत उत्पादनासाठी वापरले. उसाचे पाचट न जाळता त्याची कुटी न करता व तण कापून त्याचे खतात रूपांतर केले, तसेच जमीनही नांगरली नाही. आज श्री. नवले पेरू, अंजीर, केशर आंबा, चिकू, सीताफळ, शेवगा याची लागवड करत उत्पादन घेत आहेत. घरचा ऊस गुऱ्हाळात नेऊन साईचा गूळ सेंद्रिय गूळ तयार करून घेत त्याची विक्री सुरू केली आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

सध्या ग्राहकांच्या मागणीनुसार घरच्या सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतलेल्या सेंद्रिय गूळ आणि खपली गव्हाच्या माध्यमातून आरोग्यवर्धक बिस्किटे तयार केली आहेत. गेल्या काही वर्षांत संपर्कात आलेल्या ग्राहकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला. - अक्षय नवले  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन - किशोरी वाघ