पैसे बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी 'अशी' घडविली अद्दल...नेमके काय घडले?

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 जुलै 2020

तीन महिने होऊनही पैसे देत नसल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे तगादा लावला. मात्र उलटसुलट उत्तरे दिली जात होती. खरीप हंगामात खते, बी-बियाणे खरेदीकरिता पैसे बुडवून तालुक्‍यातील इतर ठिकाणचा भाजीपाला माल खरेदी करण्यासाठी व्यापारी आल्याचे शेतकऱ्यांना समजताच काय केले बघा...

नाशिक / घोटी : तीन महिने होऊनही पैसे देत नसल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे तगादा लावला. मात्र उलटसुलट उत्तरे दिली जात होती. खरीप हंगामात खते, बी-बियाणे खरेदीकरिता पैसे बुडवून तालुक्‍यातील इतर ठिकाणचा भाजीपाला माल खरेदी करण्यासाठी व्यापारी आल्याचे शेतकऱ्यांना समजताच काय केले बघा...

काय घडले नेमके?

मुंबई येथील भाजीपाला व्यापारी राजू गुप्ता व वाहनमालक जावेद भाई नामक व्यापारी मार्चमधील लॉकडाउन काळात चौरेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला विकत घेत होते. सुरवातीला थोडेफार पैसे देत व नंतर विश्‍वास संपादन करून शेतकऱ्यांचे तब्बल पाच लाख 43 हजार रुपये दोघांनी संगनमताने बुडविले. तीन महिने होऊनही पैसे देत नसल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे तगादा लावला. मात्र उलटसुलट उत्तरे दिली जात होती. खरीप हंगामात खते, बी-बियाणे खरेदीकरिता पैसे बुडवून तालुक्‍यातील इतर ठिकाणचा भाजीपाला माल खरेदी करण्यासाठी व्यापारी आल्याचे शेतकऱ्यांना समजताच पिक-अप (एमएच 03, सीपी 9540) हे वाहन अडवत संबंधितांना घोटी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत चौरेवाडी येथील भाऊसाहेब बबन बेंडकोळी यांसह परिसरातील 20 शेतकऱ्यांनी पोलिसांना निवेदन देत या व्यापाऱ्याकडून पैसे मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

व्यापाऱ्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन

इगतपुरी तालुक्‍यातील चौरेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांचे बागायती पिकांचे पैसे परत न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई येथील व्यापाऱ्याचे चारचाकी वाहन अडवून घोटी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 

 हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers angry on money laundering trader nashik marathi news