दुर्दैवी! त्या क्षणी ना बायको आठवली ना लेकरं; शेतकऱ्याच्या एकाच निर्णयाने सारं काही संपलं

सोमनाथ चौधरी
Friday, 28 August 2020

त्या क्षणाला ना बायको आठवली..ना लेकरं..ना कुटुंब..केवळ एकच विचार डोक्यात आणि सारं काही संपलं होतं. त्याच्या एका निर्णयाने पुढे काय होईल कदाचित हाही विचार तेव्हा त्याला करावासा वाटला नाही. केवळ आणि केवळ आर्थिक विवंचना..झालेल्या प्रकाराने कुटुंबियांनाही जबरदस्त धक्का बसला आहे.

नाशिक / दिक्षी : त्या क्षणाला ना बायको आठवली..ना लेकरं..ना कुटुंब..केवळ एकच विचार डोक्यात आणि सारं काही संपलं होतं. त्याच्या एका निर्णयाने पुढे काय होईल कदाचित हाही विचार तेव्हा त्याला करावासा वाटला नाही. केवळ आणि केवळ आर्थिक विवंचना..झालेल्या प्रकाराने कुटुंबियांनाही जबरदस्त धक्का बसला आहे.

केवळ आणि केवळ आर्थिक विवंचना

बाबूराव तांबे याच्या एकत्रित कुटूंबाला ६ एकर इतकी शेतजमीन आहे तर त्यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेचे १२ लाख  व जिव्हाळे विविध कार्यकारी सोसायटीचे ६ लाख तसेच इतर हातउसणे २ लाख असे एकूण २० लाख इतके कर्ज आहे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे डोक्यावर असलेला कर्जाचा भार कसा कमी करावा या चिंतेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. बाबुराव तांबे यांच्या पाशात दोन भाऊ पत्नी एक मुलगा भाऊजया पुतणे असा मोठा परिवार होता.

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्क

उंबराच्या झाडाला गळफास

शेतीसाठी काढलेले कर्ज फेडण्याच्या विवेचनेतून निफाड तालुक्यातील जिव्हाळे येथील शेतकरी बाबुराव निवृत्ती तांबे (वय ५५) यांनी सतत नापिकी व कर्जाला कंटाळून तसेच गुरुवारी रात्री उशिरा आपल्या  घराजवळील उंबराच्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब शुक्रवारी पहाटे निर्देशनात आली.

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers commit suicide at Jivhale nashik marathi news