
नाशिक रोड : नाशिक विभागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्ह्यांत मिळून पाच लाख ८८ हजार ४६८ शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. जिरायती, बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे दिवाळीच्या आतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याची माहिती नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘सकाळ’ला दिली.
शेतजमिनींची तीन टप्प्यांत वर्गवारी
दिवाळी सण आता तोंडावर येत आहे, त्यातच महसूल विभागात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हालचाली व कृती आराखडा आखला जात आहे. मंत्रालयातून येणाऱ्या शासनाच्या निर्देशानुसार जिरायती शेतजमिनी, बागायती शेतजमिनी आणि फळपीक असणाऱ्या शेतजमिनींची तीन टप्प्यांत वर्गवारी करण्यात आलेली असून, प्रत्येक जिल्ह्याला अनुदानही ठरविण्यात आलेले आहे. २६६६४.९१ इतक्या रुपयांची मागणी चार जिल्हे मिळून करण्यात आली असून, लवकरच याची कार्यवाही होईल.
चार जिल्ह्यांची बाधित शेतकरीसंख्या
नाशिक ४,३२,६८८
धुळे ४३,०२४
नंदुरबार ४३,७२२
जळगाव ६९,०३४
एकूण : ५८,८४,६९८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.