शेतकरीपुत्र ते थेट सैन्यदल! देशसेवेला मुलाला पाठवून कुटुंबाला अभिमान; ध्येयवेड्या प्रवासाचे पंचक्रोशीत कौतुक

बापूसाहेब वाघ
Sunday, 15 November 2020

बालपणापासून सैन्यदलात दाखल व्हायचेच हे ध्येय उराशी बाळगले होते. हा शेतकरीपुत्र उच्चशिक्षित असूनही सैन्यदलात जाण्यास पसंती दिल्याने पुरणगाव पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव होत आहे. काय घडले नेमके वाचा...

मुखेड (जि.नाशिक) : बालपणापासून सैन्यदलात दाखल व्हायचेच हे ध्येय उराशी बाळगले होते. हा शेतकरीपुत्र उच्चशिक्षित असूनही सैन्यदलात जाण्यास पसंती दिल्याने पुरणगाव पंचक्रोशीत कौतुकाचा वर्षाव होत आहे. काय घडले नेमके वाचा...

 सैन्यदलात दाखल होण्याचे स्वप्न घेऊन शेतपुत्राची उंच भरारी!​

पुरणगाव (ता. येवला) येथील विकास गोरख वरे या शेतकरीपुत्राची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने कुटुंबाबरोबर गावानेही आनंदोत्सव साजरा केला. वरे यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा गुरुवारी (ता. १२) पुरणगाव येथील वरे वस्तीवर जल्लोषात केला. देशसेवेला मुलाला पाठवून वरे कुटुंबाने मिष्टान्न देत दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

पंचक्रोशीत वरे यांचे कौतुक
विकास यांनी बालपणापासून सैन्यदलात दाखल व्हायचेच हे ध्येय ठेवून बीएस्सीचे शिक्षण घेताना लासलगाव येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत सैन्यभरतीत यश संपादन केले. उच्चशिक्षित असूनही सैन्यदलात जाण्यास पसंती दिल्याने पुरणगाव पंचक्रोशीत वरे यांचे कौतुक होत आहे. सत्कारप्रसंगी आपल्या ध्येयास गवसणी घातल्याचे समाधान व्यक्त केले. मराठा लाइट इन्फ्रंट्री बेळगाव येथे शुक्रवारी (ता. १३) ते रुजू होणार असल्याने गुरुवारी पुरणगाव येथील वरे वस्तीवर अभिनंदन सोहळा झाला.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

लहानपणापासून सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. त्यानुसार सराव व अभ्यासात सातत्य ठेवले. कुटुंबानेही वेळोवेळी सकारात्मक प्रेरणा देऊन पाठबळ दिले. त्यामुळे ध्येयास गवसणी घातल्याचा सर्वाधिक आनंद आहे. -विकास वरे, पुरणगाव 
 

 

या वेळी जनसेवक गोरख पवार, अंबादास कदम, प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, भाऊसाहेब लोणारी, योगेश लोणारी, श्रावण शिरसाठ, चिंधू वरे, पोलिसपाटील गणेश ठोंबरे, छबू ठोंबरे, दगूजी सोनवणे, दीपक ठाकरे, विकास वरे यांचे आजोबा कारभारी वरे, वडील गोरख वरे, आई मीनाबाई वरे, महेश वरे, भूषण वरे, आकाश वरे, बाबासाहेब वरे, सुनील वरे, शरद वरे, गणेश वरे, बबन वरे, मित्रपरिवार, पुरणगाव ग्रामस्थ उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer's son selected In indian army nashik marathi news