'विकेल ते पिकेल' संकल्पना! शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांसाठी स्टॉलवर

4DADA_BHUSE_0.jpg
4DADA_BHUSE_0.jpg

नाशिक : (मालेगाव) 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेचा भाग म्हणून रविवारी (ता.२०) शहरातील १३ विविध ठिकाणी स्टॉल सुरू करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांसाठी या स्टॉलवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. 

शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती हेच आमचे ध्येय आणि उद्दिष्ट

मालेगाव तालुक्यात हा छोटासा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात तो राबविला जाईल, असे प्रतिपादन श्री. भुसे यांनी यावेळी केले. उपमहापौर नीलेश आहेर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नगरसेवक सखाराम घोडके, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, शेतकरी निळकंठ निकम, प्रमोद निकम, देवरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे आदींसह शेतकरी व ग्राहक उपस्थित होते. भुसे म्हणाले, की ‘विकेल ते पिकेल’ या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील. शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी हेच आमचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. शिवाय ग्राहकांना दर्जेदार, ताजा भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

येथे सुरू झाले स्टॉल 

शहरात सटाणा नाका, डी. के. कॉर्नरजवळ, अरोमा थिएटरजवळ, दौलती हायस्कूलजवळ, कृषिनगर स्टॉपजवळ, साठफुटी रोड डॉ. शरद पाटील यांच्या हॉस्पिटलजवळ, चर्चगेटजवळ, मोतीबाग नाका, रावळगाव नाका, वर्धमाननगर प्रवेशद्वाराजवळ, दत्त मंदिर, संगमेश्वर, निसर्ग चौक, कलेक्टर पट्टा, जुने आरटीओ ऑफिस, नामपूर रोड या ठिकाणी स्टॉल लावले आहेत.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com