शेतकरी बंधूनो! पावसानं पिकांचं नुकसान केलंय? निश्चिंत रहा; नुकसान भरपाई मिळणार

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Saturday, 24 October 2020

पाच जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठ्या नगर जिल्ह्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यातील ५७१ गावे बाधित झाली असून, त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ४४१, जळगाव- ३२, नंदुरबार- ३१ व धुळे जिल्ह्यातील आठ गावांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले. 

नाशिक : (नाशिक रोड) २१ ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील तब्बल एक लाख आठ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर अशा पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण १२५ कोटी ९८ लाख ४५ हजार ८०५ रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. 

बाधित गावांची गणना व क्षेत्रफळांची गणना

प्राथमिक स्वरूपात शासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पाचही जिल्ह्यांमध्ये एक हजार ८३ गावे परतीच्या पावसाने बाधित झाली आहेत. १ ते २१ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सध्या तयार केला जात आहे. त्यानुसार ही मुख्य आकडेवारी महिनाअखेरीस जाहीर केली जाणार असली, तरी प्राथमिक अंदाजानुसार सध्या बाधित गावांची गणना व क्षेत्रफळांची गणना केली जात आहे. 

हेही वाचा > क्षणार्धात संसाराची राखरांगोळी! चव्हाण कुटुंबियांचे ५० हजारांचे नुकसान 

आठ गावांमधील पिकांचे मोठे नुकसान 

नाशिक विभागात भात, मका, नागली, वरई, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, कांदा व कांदा रोपे, टोमॅटो, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे, केळी, पपई, ज्वारी, ऊस, मिरची या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाच जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठ्या नगर जिल्ह्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यातील ५७१ गावे बाधित झाली असून, त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ४४१, जळगाव- ३२, नंदुरबार- ३१ व धुळे जिल्ह्यातील आठ गावांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले. 

हेही वाचा > धक्कादायक! उपजिल्हाधिकारी दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतले; जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will get compensation of Rs 126 crore nashik marathi news