पुन्हा धाकधूक वाढली! मालेगावमध्ये पन्नास बाधितांचा समावेश.. प्रशासकीय यंत्रणा सावध

अरुण मलाणी
Wednesday, 5 August 2020

मालेगावाची परिस्‍थिती आटोक्‍यात आलेली असतांना, नव्‍याने आढळलेल्‍या पन्नास रूग्‍णांच्‍या बाबत प्रशासकीय यंत्रणा सावध झाली आहे. या रूग्‍णांना कोरोनाची लागण कुठल्‍या माध्यमातून झाली, यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरुन तपास केला जातो आहे. 

नाशिक / मालेगाव : मालेगावाची परिस्‍थिती आटोक्‍यात आलेली असतांना, नव्‍याने आढळलेल्‍या पन्नास रूग्‍णांच्‍या बाबत प्रशासकीय यंत्रणा सावध झाली आहे. या रूग्‍णांना कोरोनाची लागण कुठल्‍या माध्यमातून झाली, यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरुन तपास केला जातो आहे. 
 

मालेगावच्‍या पन्नास बाधितांचा समावेश, दिवसभरात दोघांचा मृत्‍यू 
दिवसभरात आढळलेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४१९ रूग्‍ण असून, नाशिक ग्रामीणचे १११ रूग्‍ण आहेत. दरम्‍यान गेल्‍या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्‍या मालेगाव महापालिका क्षेत्रात पुन्‍हा एकदा लक्षणीय कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बुधवारी आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांपैकी ५० बाधित मालेगावमधील आहेत. तर एका जिल्‍हाबाह्य रूग्‍णाचा समावेश आहे. बरे झालेल्‍या ५२८ रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ३५० रूग्‍ण असून, नाशिक ग्रामीणचे १७५, मालेगावच्‍या तीन रूग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. शहरातील ७१ वर्षीय व जेलरोडच्‍या ६७ वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान दिवसभरात नाशिक शहरात ७२९ संशयितांसह नाशिक ग्रामीणचे २०३, मालेगावला ३६ तर गृहविलगीकरणातील १०७ असे एकूण १ हजार ०७५ संशयित आढळून आले आहेत. तर सायंकाळी उशीरापर्यंत तब्‍बल १ हजार ३२१ अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

दिवसभरात ५८१ नवीन कोरोनाबाधित

नाशिक जिल्‍हाभरासह शहरी भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.५) दिवसभरात ५८१ नवीन कोरोनाबाधित आढळून आल्‍याने आतापर्यंतच्‍या कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार ७०७ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ५२८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या १२ हजार ८१२ झाली आहे. दोन रूग्‍णांच्‍या मृत्‍यूमुळे आतापर्यंतच्‍या मृतांचा आकडा ५४७ वर पोहोचला आहे. 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

रिपोर्ट - अरुण मलाणी

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty corona virus affected in Malegaon nashik marathi news