...अन् त्यांनी महिला डॉक्‍टरसह परिचारिकेला अर्वाच्य शिवीगाळ केली..संचारबंदीत धक्कादायक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 27 एप्रिल 2020

संचारबंदी लागू असताना मद्यपींनी महिला डॉक्‍टरसह परिचारिकेला अर्वाच्य शिवीगाळ केली. तसेच संशयिताने परिचारिकेचा उजव्या हात धरत ओढताण केली, असा उल्लेख फिर्यादीत असतानादेखील तपासी अधिकारी संबंधिताचा हेतू हा विनयभंग करण्याचा नसल्याचा युक्तिवाद करीत आहेत. त्यांच्या युक्तिवादामुळे पोलिसांनी लावलेली कलमे संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच तो रुग्ण साथीचा नाही म्हणून राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे कलम नाही, हेही हास्यास्पद आहे. राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये लॉकडाउनमधून जायखेडा पोलिस ठाणे वगळण्यात आले आहे का, असाही प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहे. 

नाशिक / नामपूर : अलियाबाद (ता. बागलाण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी रुग्णावर उपचार करण्याच्या मुद्द्यावरून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक यांच्यात वाद झाला. त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात संचारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्याने गुन्हा दाखल

अलियाबाद येथील उमेश चौरे याला दुचाकीमुळे जखम होऊन रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे संशयित योगेश महाले व संदीप गांगुर्डे त्याला शनिवारी (ता.25) रात्री अकराच्या सुमारास अलियाबादच्या वैद्यकीय केंद्रात घेऊन गेले. त्या वेळी उपचार करण्यावरून आरोग्यसेविका, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा मोहिते यांच्याशी संशयितांनी वाद घातला. संशयित अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्याने जायखेडा पोलिसांत डॉ. मोहिते यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. 

परस्त्रीचा हात धरून ओढताण; विनयभंग नव्हे का? 
संचारबंदी लागू असताना मद्यपींनी महिला डॉक्‍टरसह परिचारिकेला अर्वाच्य शिवीगाळ केली. तसेच संशयिताने परिचारिकेचा उजव्या हात धरत ओढताण केली, असा उल्लेख फिर्यादीत असतानादेखील तपासी अधिकारी संबंधिताचा हेतू हा विनयभंग करण्याचा नसल्याचा युक्तिवाद करीत आहेत. त्यांच्या युक्तिवादामुळे पोलिसांनी लावलेली कलमे संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच तो रुग्ण साथीचा नाही म्हणून राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे कलम नाही, हेही हास्यास्पद आहे. राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये लॉकडाउनमधून जायखेडा पोलिस ठाणे वगळण्यात आले आहे का, असाही प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! टेम्पोवर बोर्ड अत्यावश्यक सेवेचा...अन् आतमध्ये मात्र भलतंच

संचारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
केंद्राने लागू केलेल्या कायद्याचा शासन निर्णय अद्याप प्राप्त झालेला नाही. जखमी रुग्ण कोरोना किंवा साथीच्या आजाराशी निगडित नाही. विनयभंगाच्या हेतूने हा वाद झाला नसून उपचारासाठी दारूच्या नशेत संशयितांनी शिवीगाळ केली. त्यामुळे संचारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. - शिवचरण पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक 

संचारबंदीचा गुन्हा दाखल 
या संदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार विनयभंगाच्या हेतूने हा वाद झाला नाही. तसेच हा रुग्ण साथरोगाचा नसल्याने साथरोग नियंत्रण कायद्याचे कलम लावण्यात आले नसल्याचे सांगितले.  

हेही वाचा > संचारबंदीतही 'ते' 'मालेगाव टू सिडको'?...अन् नातेवाईकांनीही दिला आसरा...कारवाई तर होणारच!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting with female doctors in Aliabad Both were charged under the curfew law nashik marathi news