ह्रदयद्रावक! लेकराला दूध पाजण्यासाठी एकीकडे मातेची धडपड...दुसरीकडे पती करायचा एैश

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 18 June 2020

फातमाचा पती जमील याला दारूचे व्यसन होते. घरी किराणा, रेशन भरून न देता दारूच्या नशेतच तो पैसे उडवीत होता. यावरून त्यांच्यात वादही होत होते. पतीकडे दुर्लक्ष करीत मुलीसाठी फातमा परिसरात मिळेल ते मागून मुलगी व आपला उदरनिर्वाह करीत होती. अखेर तिने परिस्थितीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले होते..

नाशिक / मालेगाव : फातमाचा पती जमील याला दारूचे व्यसन होते. घरी किराणा, रेशन भरून न देता दारूच्या नशेतच तो पैसे उडवीत होता. यावरून त्यांच्यात वादही होत होते. पतीकडे दुर्लक्ष करीत मुलीसाठी फातमा परिसरात मिळेल ते मागून मुलगी व आपला उदरनिर्वाह करीत होती. अखेर तिने परिस्थितीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले होते..

अखेर मातेने उचलले पाऊल

मालेगाव शहरातील रमजानपुरा भागात राहणाऱ्या फातमाचा पती जमील याला दारूचे व्यसन होते. घरी किराणा, रेशन भरून न देता दारूच्या नशेतच तो पैसे उडवीत होता. यावरून त्यांच्यात वादही होत होते. पतीकडे दुर्लक्ष करीत मुलीसाठी फातमा परिसरात मिळेल ते मागून मुलगी व आपला उदरनिर्वाह करीत होती. कोरोना संसर्ग काळातील बिकट परिस्थिती, पतीचा छळ व मारहाणीमुळे ती त्रस्त झाली होती. अखेर 15 जूनला तिने घरात पंख्याला ओढणीने फाशी घेत आत्महत्या केली. फातमाच्या वडिलांनी तक्रार दिली. उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी करून फातमाच्या वडिलांची तक्रार दाखल करून घेतली. पती जमील अहमदविरुद्ध रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निरीक्षक थोरात तपास करीत आहेत. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

पतीला अटक

मालेगाव शहरातील रमजानपुरा भागात व्यसनाधीन पती व आर्थिक विवंचनेमुळे अडीच वर्षांच्या मुलीला दूध पाजल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या फातमा जमील अहमद (वय 23, रा. रमजानपुरा) हिच्या आत्महत्येप्रकरणी पती जमील अहमद मोहंमद साबीर (रा. हनीफनगर, रमजानपुरा) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फातमाचे वडील जहीर शेख नजर (वय 65, रा. नवनाथनगर, घोटी) यांनी फिर्याद दिली. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case against woman,s husband who committed suicide nashik marathi