अखेर झालीच नांदगावात कोरोनाची एन्ट्री...केवळ तीन दिवसच अत्यावश्‍यक सेवा सुरु ​

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

चार दिवस आधी शहरातील दोन महिलांना कोरोना संशयित म्हणून साकोऱ्याच्या सारतळे कोरोना केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. त्यापैकी एकीचा बुधवारी रात्री पॉझिटीव्ह अहवाल आला. अहवाल आल्यानंतर प्रशासनाने पहाटेच संबधित भाग सील करण्यास सुरवात करून कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी व विलगीकरण प्रक्रिया सुरु केली.

नाशिक / नांदगाव : लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर गेले दोन महिने नांदगाव शहरात कोरानाचा शिरकाव नव्हता. मात्र पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शहरात आढळून आल्याने नगर परिषद प्रशासनाची धावपळ उडाली. याची दखल घेत यापुढील तीन दिवस केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

केवळ तीन दिवस अत्यावश्‍यक सेवा सुरु ​

चार दिवस आधी शहरातील दोन महिलांना कोरोना संशयित म्हणून साकोऱ्याच्या सारतळे कोरोना केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. त्यापैकी एकीचा बुधवारी रात्री पॉझिटीव्ह अहवाल आला. अहवाल आल्यानंतर प्रशासनाने पहाटेच संबधित भाग सील करण्यास सुरवात करून कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी व विलगीकरण प्रक्रिया सुरु केली. उच्च धोका असलेल्या 7 जणांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले असून त्यात एका डॉक्‍टरचा ही समावेश आहे. निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या घरापासून 300 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन व 500 मित्र पर्यंत बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. सदर रुग्णाच्या घराच्या आजूबाजूला फळ विक्रेत्यांची गोदामे आहेत. आंबे व्यापार मालेगाव शहराशी निगडीत आहे. माहितीनुसार कोरोनाग्रस्त महिलेचे वय 55 असून ती भाजीपाला व फळे घेण्यासाठी बाजारात जात असे. त्यामुळे समुदाय हस्तांतरणाचा धोका आहे. 

हेही वाचा > सप्तपदीही झाली...अन् नवरीला सोडून नवरदेवाचे वर्‍हाडी फिरले माघारी...बातमी समजल्यावर मंडळींना मोठा धक्का

चौथ्या लॉकडाऊनमध्ये नांदगाव नॉन रेडझोन

दरम्यान बाहेगावाहून येणारे भाजीपाला व फळ विक्रेते शहरात अद्यापही येत असल्याची माहिती आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या शून्य असल्याने चौथ्या लॉकडाऊनमध्ये, नांदगाव शहराचा समावेश नॉन रेडझोन मध्ये करण्यात आला. त्यामुळे शहरात सर्व व्यवहार सुरु करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान वारंवार मास्क वापरण्याचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन नगरपरिषदे कडून करण्यात येत होते. काही अपवाद वगळता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली नागरिकांनी सर्रास केली. एरवी आठवडे बाजाराच्या दिवशी दिसणारी गर्दी गांधी चौकात दररोज दिसू लागली. पुढील तीन दिवस किराणा, मेडिकल, दवाखाने व दुध यांनाच परवानगी देण्यात आली आहे. 

हेही वाचा > ''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Corona's entry in Nandgaon nashik marathi news