Sakal Impact : अखेर सिव्हिलमधील कोरोना कक्षाची 'ती' लिफ्ट सुरु...रुग्णांची थांबली परवड!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

रुग्णांसाठी लागणारे ऑक्‍सिजनचे सिलेंडरही चतुर्थश्रेणीच्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना जिन्याने वाहून न्यावे लागत होते. ही बाब गंभीर असल्याने "सकाळ'मधून बुधवारी (ता. 20) प्रसिद्ध झाले होते. हेच वृत्त मंगळवारी (ता. 19) इ-सकाळवर ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याने त्याची तात्काळ दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदरची लिफ्ट तात्काळ दुरुस्त करण्यासंदर्भात ताकीद दिल्यानंतर मंगळवारी (ता. 19) सायंकाळीच लिफ्टची दुरुस्ती होऊन सुरू झाली.

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या सिंहस्थ कुंभमेळा इमारतीची आठवडाभरापासून बंद असलेली लिफ्ट अखेर सुरू झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळा ही चार मजली इमारत सध्या कोरोना कक्षासाठी अधिग्रहित असून याच ठिकाणी कोरोना संशयित व बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र आठवडाभरापासून लिफ्ट नादुरुस्त असल्याने रुग्णांपासून ते ऑक्‍सिजन सिलेंडर ने-आण करण्याच्या अडचणींना रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. 

सकाळच्या बातमीचा परिणाम.. तात्काळ दखल
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागे सिंहस्थ कुंभमेळा ही चार मजली इमारत आहे. सध्या याच इमारतीमध्ये कोरोना कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. कोरोना संशयित व बाधित रुग्णांवर याच इमारतीमध्ये उपचार होतात. मात्र, गेल्या आठवडाभरापासून या इमारतीची लिफ्ट नादुरुस्त झाल्याने बंद होती. त्यामुळे कोरोना कक्षामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना जिन्याने पहिल्या-दुसऱ्या मजल्यावर जावे लागत होते. गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना झोळी करून तिसऱ्या-चौथ्या मजल्यावर न्यावे लागत होते. तसेच, रुग्णांसाठी लागणारे ऑक्‍सिजनचे सिलेंडरही चतुर्थश्रेणीच्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना जिन्याने वाहून न्यावे लागत होते. ही बाब गंभीर असल्याने "सकाळ'मधून बुधवारी (ता. 20) प्रसिद्ध झाले होते. हेच वृत्त मंगळवारी (ता. 19) इ-सकाळवर ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याने त्याची तात्काळ दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदरची लिफ्ट तात्काळ दुरुस्त करण्यासंदर्भात ताकीद दिल्यानंतर मंगळवारी (ता. 19) सायंकाळीच लिफ्टची दुरुस्ती होऊन सुरू झाली. त्यामुळे कोरोना कक्षामध्ये कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहेत. 
 

हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?

"सकाळ' वृत्ताची दखल घेत तात्काळ त्यासंदर्भातील कारवाई करण्यात आली. त्यानुसार कोरोना कक्ष असलेल्या कुंभमेळा इमारतीची लिफ्ट सुरू झालेली आहे. - व्ही.डी. पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय. 

हेही वाचा >  GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally the lift in Civil started of corona division nashik marathi news