नशिबी दुर्दैवच! शेतकऱ्याने काबाडकष्टाने पिकवलेले पीक क्षणात भस्मसात; पन्नास हजारांचे नुकसान

बाबासाहेब कदम
Friday, 13 November 2020

येथील शेतकरी सोळशे यांच्या शेती क्षेत्रावर त्यांनी मका लागवड केली होती. कितीतरी  दिवसांच्या मेहनतीनंतर शेतात साठवून ठेवलेल्या मका पिकास अचानक आग लागली अन् काबाडकष्टाने पिकवलेले पीक भस्मसात झाल्याने त्यांच्या दिवाळी सणावर विरजण पडले आहे. 

नाशिक/बाणगाव बुद्रुक : येथील शेतकरी सोळशे यांच्या शेती क्षेत्रावर त्यांनी मका लागवड केली होती. कितीतरी  दिवसांच्या मेहनतीनंतर शेतात साठवून ठेवलेल्या मका पिकास अचानक आग लागली अन् काबाडकष्टाने पिकवलेले पीक भस्मसात झाल्याने त्यांच्या दिवाळी सणावर विरजण पडले आहे. 

बामणगाव बुद्रुक गावातील शेतकऱ्याच्या शेतातील सोंगणी केलेल्या मक्याच्या बिट्ट्या व चारा साठवूण ठेवला होता. त्यास आग लागून २५ ते ३० क्विंटल मक्याच्या बिट्ट्या व दोन ट्रॉली ट्रॅक्टर चारा खाक झाला. यात शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठी अमित उगले यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

हेही वाचा>> विकृती थांबता थांबेना! एकविसाव्या शतकातही 'ती' ठरतेय अन्यायाची शिकार

बाणगाव बुद्रुक (ता. नांदगाव) येथील शेतकरी नामदेव सोळशे यांच्या गट नं. १७४/१ मधील क्षेत्रावर मका लागवड केली होती. त्या पिकाची सोंगणी करून पीक शेतात पडले होते. दरम्यान, बुधवारी (ता. ११) मक्यास अचानक आग लागून, या घटनेत मकापीक खाक झाले. आगीचे कारण समजले नाही. मका पिकास व चाऱ्यास अचानक आग लागून पूर्ण पीक भस्मसात झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या नुकसनीमुळे शेतकऱ्याच्या दिवाळी सणावर  विरजण पडले आहे. 

हेही वाचा>> शेतकऱ्याच्या मेहनतीवर वाईट नजर आणि क्षणातच सारं संपल! दीड एकरवरील द्राक्षबाग उदध्वस्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire destroyed a maize crop worth 50 thousands nashik marathi news