नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या पहिल्या महिला कुली; इंदूबाईंच्या हिमतीला सलाम!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे व्यवस्थापक विवेक गुप्ता आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांनी इंदूबाई एकनाथ वाघ यांची पहिली महिला कुली म्हणून नियुक्ती केली.

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात पहिली महिला कुली म्हणून नियुक्त झाल्याबद्दल इंदूबाई वाघ यांचा भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे सत्कार झाला. पांडुरंग मानकर या रेल्वेस्थानकात अनेक वर्षे कुली म्हणून काम करत होते. त्यांना वयोमानानुसार काम करणे अवघड झाले होते.

पहिल्या महिला कुली; इंदूबाईंच्या हिमतीला सलाम!

प्रशासनाच्या आरोग्य तपासणीत ते अपात्र ठरल्याने नियमानुसार त्यांचा बिल्ला क्र. ०७ त्यांच्या वारसांना देण्यात येणार होता. म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे व्यवस्थापक विवेक गुप्ता आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांनी इंदूबाई एकनाथ वाघ यांची पहिली महिला कुली म्हणून नियुक्ती केली. सत्काराप्रसंगी शहराध्यक्ष व नगरसेविका हिमगौरी आडके, शिक्षण समितीच्या सभापती संगीता गायकवाड यांच्या हस्ते सत्कार झाला. नगरसेविका कोमल मेहोरोलिया, शहर उपाध्यक्षा अलका जांभेकर, शहर चिटणीस सुजाता जोशी, चिटणीस कांचन चव्हाण आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > आश्चर्यंच! चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती

हेही वाचा > अजबच! बारा लाखांचे गाठोडे बाळगणाऱ्या 'त्या' फोटोमुळे प्रचंड मनस्ताप; काय घडले वाचा..​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first female coolie of Nashik Road railway station nashik marathi news