अकरावी प्रवेश : पहिली यादी ३० ऑगस्टला; पहा प्रवेशाचे संभाव्‍य वेळापत्रक

first list for class 11th entrance declared on 30 august nashik marathi news
first list for class 11th entrance declared on 30 august nashik marathi news

नाशिक : नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीसाठी आवश्‍यक असलेला भाग दोन भरण्याची प्रक्रिया बुधवार (ता. १२)पासून सुरू होणार आहे. पहिल्‍या गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांना आपले पर्याय निवडीसाठी २२ ऑगस्‍टपर्यंत मुदत असेल. येत्या ३० ऑगस्‍टला पहिली गुणवत्ता यादी (मिरीट लिस्‍ट) जाहीर केली जाणार आहे. 

उद्यापासून भरता येणार ‘भाग दोन’ 

अकरावी प्रवेशप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्‍या महाविद्यालयांचा पसंतीक्रम व शाखा निवडीकरिता अर्जाचा भाग दोन असल्‍याने, या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. शिक्षण विभागाने प्रवेशाकरिताचे वेळापत्रक जारी केले आहे. त्‍यानुसार यापूर्वी नोंदणी करत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. बुधवारपासून २२ ऑगस्‍टपर्यंत याकरिता मुदत दिलेली आहे. इन हाउस किंवा अन्‍य कोट्यामधून प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची आवश्‍यकता नसेल. 

जागांपेक्षा अर्जांची संख्या अधिक 

शहरातील साठ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध शाखांकरिता २५ हजार २७० जागा उपलब्‍ध आहेत. अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या २८ हजार ६१० इतकी आहे. यांपैकी सर्वाधिक अर्ज विज्ञान शाखेसाठी प्राप्त झाले आहेत. 


असे आहे प्रवेशाचे संभाव्‍य वेळापत्रक 

* प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे ------------ १२ ते २२ ऑगस्‍ट 
* तात्‍पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी -------- २३ ऑगस्‍ट 
* यादीसंदर्भात हरकती नोंदविण्याची मुदत ------२५ ऑगस्‍ट (सायंकाळी पाचपर्यंत) 
* नियमित प्रवेशफेरी एकसाठी गुणवत्ता यादी ---३० ऑगस्‍ट 
* यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची मुदत---३१ ऑगस्‍ट ते ३ सप्‍टेंबर 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com