दादा..अक्षय तृतीयाला नाही येणं होणार रे माहेरी..! यंदाचा सण सासरीच

akshay tritiya.png
akshay tritiya.png
Updated on

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय तृतीया (आखाजी) सण रविवार (ता.26) रोजी असून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे यावर्षी हा सण सुनासुना जाणार, माहेरची ओढ असणार्याना यंदा सासरीच राहावे लागणार आहे. त्यामुळे माहेरवासिनी आपल्या भाऊला आपल्या अहिराणी भाषेत सांगते, 'भाऊ कोरोना शे तुनी तब्येत संभाळ, मी पण लक्ष दि राहिनु यंदानी आखाजी सासरले करस, बाहेर पडू नको'. 

माहेरवाशियाची अक्षय तृतीया यंदा प्रथमच सासरी  

ग्रामीण भागात आजच्या धावपळीच्या युगात ही दिवाळी आखाजी या सणांना विशेष महत्त्व आहे. पुर्वी गावांमध्ये एकञ कुंटुबपध्दत अमलात होती. त्यामुळे माहेरवाशीण दिवाळी व आखाजी या सणांना माहेरी आपला भाऊ अवर्जुन घेण्यासाठी येत असे. आजच्या आधुनिक युगात एकञ कुटुंबपध्दत मागे पडली असली तरी माहेरवाशीण एक दिवस जाऊन आपली ओढ पुर्ण करते. या सणासाठी बहुतेक गावांमध्ये मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्वञ संचारबंदी लागू असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. या दिवशी घरोघर मातीच्या घागरीचे पुजा करतात, पुरणपोळी, कारंज्या, सोळी, आदि पदार्थाचे नवैद्य घालतात. लहान बालकांसह महिला झाडांना झोके बांधून आपला पारंपरिक आनंद या दिवशी घेतात. यंदा बालकांना घरातच झोक्याचा आनंद घेत आहे. शेतीच्या नवीन कामाची वसालगडीचे सुरूवात याच दिवसापासून करतात तितकेच महत्त्व आजही टिकून आहे.

पुर्वीच्या प्रथांना महत्त्व 

चैञ पोर्णिमेनंतर अक्षय तृतीया निमित्ताने ग्रामीण भागात घरोघरी लाकडाची प्रतिकृती असलेल्या गौराईची प्रतिस्थापना मुली करतात. पंधरा दिवस पुजा करून रोज गौराईला आंब्याची नवीन पञी शुद्ध पाणी तांब्यात आणून गौराई पुढे ठेवतात. मुली रस्त्यावरून येत असताना गौराईचे गाणे म्हणतात, हे पुर्वी असले तरी बहुतांश गावांमध्ये मूली पुर्वीच्या प्रथांना महत्त्व देण्याचा प्रयत्न करतात. यंदा लॉकडाऊनमुळे फक्त गौराई स्थापना करून पुजा होत आहे. अक्षय तृतीयाला पुरणपोळीचे नवैद्य देऊन विसर्जन करण्यात येते. यादिवशी शेतीच्या कामाला शेतकरी विश्रांती घेत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com