जागतिक पुस्तक दिन : स्मार्टफोनमध्ये हरविलेल्या पिढीला पुस्तकात दडलेली माणसे भेटतील का?

pustak.jpg
pustak.jpg
Updated on

नाशिक : जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू दिनही म्हणून २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. आजच्या पिढीला शेक्सपिअर कोण होता म्हणून विचारलं तर दोन मिनिटांत इंटरनेटवर सर्च करुन फाडफाड इंग्लिशमध्ये सांगतील. पण जो कट्टर पुस्तक वाचक असतो त्याने शेक्सपिअर अनुभवलेला असतो. पुस्तक हातात पकडून ते वाचत बसण्यापेक्षा इंटरनेटवर तेच पुस्तक पीडीएफ वाचन करायला जास्त आवडीचं बनतंय. कुठेतरी स्मार्टफोन अन् इंटरनेटच्या जगात मात्र पुस्तक हरवतंय.

स्मार्टफोनच्या एक फोल्डरमध्ये पुस्तक अगदीच फिट्ट बसतंय

कपाटात, माळ्यावर, खोलीत ते धूळ खात पडलेलं पुस्तक अडगळ होतांना दिसत आहे. ज्ञानाचा अथांग सागर समजले जाणारे पुस्तक आता स्मार्टफोनच्या एक फोल्डरमध्ये अगदीच फिट्ट बसतंय कितीही नंतर वाचू म्हटलं तरी फक्त स्टोरेज भरवतांना दिसून येते. काही लोकांना पुस्तक म्हटलं की शो-पीस झाले आहे. खास कपाट करुन त्यात मांडली जाता त्या पुस्तके मात्र कधी त्यातला पहिलं पान देखील उघडून बघितलेलं नसते. स्मार्टफोन अन् इंटरनेटच्या आधी ही पुस्तकेच तर होती, ज्यात कुणाचं तरी आयुष्य कैद केलेलं होतं. सुख, दु:ख, आनंद, प्रेम अशा कितीतरी गोष्टी घटना त्या छोट्याशा पुस्तकात अगदी हरवून स्वत:ला मांडलं जातांना दिसून येतं. याचं पुस्तकांत दडलेल्या भावना, ज्ञान, विचार युवा पिढीला पचतील का? हा ही मोठा प्रश्नच आहे. 

एक क्लिक का खेल हैं बाबा

इंटरनेटवर एक क्लिकवर माहीती मिळते मग बोलक्या पुस्तकाचा विसर तर होणारच, पण शब्दांच्या पलिकडे अर्थ मात्र पुस्तकातील मजकूरात हरविल्यावरच उमगत असतात. आहे माझ्याकडे त्या पुस्तकाची पिडीएफ म्हणून कितीतरी वर्ष ते मोबाईलमध्ये सेव्ह असता पण ते पुस्तक वाचनं होतं नाही. स्मार्टफोन अन् इंटरनेट माणसाला अळशी बनवतंय हे मात्र खरं आहे. पुस्तक प्रेमी, वाचनाची आवड असणारे यांच्यानंतर पुस्तक हे फक्त स्टेटस ठेवण्यासाठी फोटो काढून ठेवण्यापुरते तर महत्वाचे नाही नं? हे मात्र न सुटणारे कोडे आहे.

वाचन नव्हे काही लोक पुस्तकदेखील जगताय

पुस्तकाच्या कोणत्या पानावर, कितव्या ओळीत काय लिहीलंय हे देखील न विसरता लक्षात ठेवणारे ही काही वाचक आहे. अक्षर, शब्द, ओळ, परिच्छेद, अख्खा एक लेख लिहीलेल्या त्या पुस्तकाच्या अगदी प्रेमातच पडता. मला या लेखकाचे पुस्तक आवडं काय लिहीलंय यार असं वाटतं की माझं आयुष्यच पुस्तकात उतरवलं आहे असं म्हणतं पुस्तकाला स्वत:च्या आयुष्याशी समरस होणारे ही पुस्तक लोकांच्या अंतकरणात अगदी खोलवर रुजलेली असता. लेखकाचे फक्त नाव जरी घेतलं तरी वाक्यासकट त्याची अॅक्टिंग देखील करुन दाखविली जाते. चांगली पुस्तके अन् त्यांची गोडी ही पुस्तक प्रेमीच समजू शकतो. मोबाईल अन् इंटरनेट हे वाचनासाठी माहीती तर नक्की देतील पण वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तकाचं पान खोलून पान पलटल्यानेच निर्माण होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com