esakal | ते पाचही जण विवाहितेच्या घरात घुसले; घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime 123.jpg

विवाहिता म्हणाली, "ते पाच जण माझे दीर राहुल मोरे यांचा निवासाचा पत्ता मागू लागले. माझे पती संजय मोरे यांनी मला पूर्ण पत्ता माहीत नाही, असे सांगितले". त्यानंतरच तो धक्कादायक प्रकार घडला. 

ते पाचही जण विवाहितेच्या घरात घुसले; घडलेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : विवाहिता म्हणाली, "ते पाच जण माझे दीर राहुल मोरे यांचा निवासाचा पत्ता मागू लागले. माझे पती संजय मोरे यांनी मला पूर्ण पत्ता माहीत नाही, असे सांगितले". त्यानंतरच तो धक्कादायक प्रकार घडला. 

काय घडले नेमके?

शीतल संजय मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शोभा बाविस्कर, दीपक बाविस्कर, शीतल संगमनेरे, सागर जाधव व आणखी एकजण माझ्या घरी आले. ते माझे दीर राहुल मोरे यांचा निवासाचा पत्ता मागू लागले. माझे पती संजय मोरे यांनी मला पूर्ण पत्ता माहीत नाही, असे सांगितले. त्यामुळे पाचही जणांनी माझ्या पतीला घरात घुसून मारहाण करून जखमी केले व सामानाची नासधूस केली. टेबलावर ठेवलेले सोन्याचे टॉप्स गहाळ झाले. यावरून उपनगर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

घरात घुसून एकाला मारहाण करून जखमी

उपनगर येथील पगारे मळा परिसरात राहण्याचा पत्ता सांगितला नाही, म्हणून पाच जणांच्या टोळक्याने घरात घुसून एकाला मारहाण करून जखमी केले व घरातील सामानाचे नुकसान केले.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद