बारा अन् सोळा दिवसाचे बच्चे रियल फायटर्स! अखेर केलेच कोरोनाला चितपट..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

कोरोना नावाच्या राक्षसाने अजगरासारखे भेटेल त्याला गिळकृत करण्याची मोहीमच हाती घेतली आहे..छोटी मुले आणि वयोवृद्ध तर धोक्‍याच्या निशाण्यावर आहेच पण ज्याच्याकडे त्याला चितपट करण्याची ताकद आहे ते रियल कोरोना फायटर ठरताय.

कोरोनाला चितपट करणारे बारा अन सोळा दिवसाचे बच्चे रियल फायटर्स!
येवल्यातील पाचजण कोरोनावर मात करून सुखरूपपणे घरी

नाशिक / येवला : कोरोना नावाच्या राक्षसाने अजगरासारखे भेटेल त्याला गिळकृत करण्याची मोहीमच हाती घेतली आहे..छोटी मुले आणि वयोवृद्ध तर धोक्‍याच्या निशाण्यावर आहेच पण ज्याच्याकडे त्याला चितपट करण्याची ताकद आहे ते रियल कोरोना फायटर ठरताय..२६ मे रोजी येथील ११ आणि १3 दिवसाचे दोन बालके कोरोणा बाधित सापडली आणि येवलेकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला पण त्यानंतरच्या १६ दिवसात याच चिमुकल्यानी जिल्हा रुग्णालयात उपचाराला प्रतिसाद दिला आणि आज ही बालके सुखरूप घरी पोहोचल्याचे ऐकून अनेकांना हायसे वाटले आणि डोळेही पाणावले..

आज अचानक आनंदाची वार्ता समजावी
अतिशय दक्ष राहून काळजी घेत असताना महिलेचे मालेगाव येथे प्रसूतीचे निमित्त झाले आणि शहरात कोरोणाचा शिरकाव झाला.. २३ एप्रिलला पहिली महिला रुग्ण येथे आढळली अन दोन दिवसांत २६ एप्रिलला तिच्याच कुटुंबियातील पाच जण बाधित सापडल्याने येवलेकर हादरुनच गेले होते. या सर्वांवर गेले पंधरा दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.विशेष म्हणजे जी महिला मालेगावात प्रसूती झाली ती महिला निगेटिव्ह आली असली तरी तिचे १२ दिवसाचे अन तिच्या नंनदेचे १६ दिवसाचे बाळ कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.तीन महिलेसह हे दोन्ही बाळ त्याचवेळी नाशिकला उपचारासाठी हलवले होते.सुदैवाने त्यानंतर या कुटुंबातील संपर्क साखळी तुटली आणि एकही रुग्ण आढळला नाही पण या चिमुकल्यांचे काय याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून होते आणि आज अचानक आनंदाची वार्ता समजावी तसा निरोप आला...ऐकून सर्वांना हायसे वाटले..

हेही वाचा >नियतीचा क्रूर डाव! कामधंदा नाही म्हणून कुटुंबासह निघाला गावी..पण कसारा घाटातच "त्याचा" काळ उभा होता..​

परिचारिका आणि डॉक्टर यांच्या मेहनतीचा हा विजय
येथील ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांचे आज प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शैलजा कुप्पास्वामी यांनी या महिलेला पुष्पगुच्छ देऊन स्वागत परत येवलेकरांना लढण्याचा चांगला संदेश दिल्याची भावना व्यक्त केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र गायकवाड,तहसीलदार रोहीदास वारुळे, नगरसेवक शफिक शेख,वसीम शेख परिचारिका आदी उपस्थित होते.या चौदा दिवसात ग्रामीण रुग्णालयात आमची निष्ठेने सेवा करणाऱ्या परिचारिका आणि उपचार करणारे डॉक्टर यांच्या मेहनतीचा हा विजय असून त्यांच्यामुळेच आम्ही या आजारातून बरे होऊन परतल्याची भावना या महिलेने यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा > मैलो न मैल अखंड प्रवास..अन् भररस्त्यात सुरू झाल्या प्रसूती वेदना..मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five from Yeola Corona free and returned home safely nashik marathi news