VIDEO : लोककलावंताची अप्रतिम कला... मेळाव्यात लोककलावंतांनी मांडल्या व्यथा

lok kalavant 1.jpg
lok kalavant 1.jpg

नाशिक :  सुरगाणा वावर पाडा येथे अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे लोक कलावंत मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी शाहिर आणि विविध लोक कला सादर करण्यात आली. यावेळी शाहिर होनाजी बाळा संयुक्त महाराष्ट्रचे साहित्यरत्न लोक शाहिर आण्णभाऊ साठे यांची शाहिरी सादर करण्यात आली. यानंतर लोकनाट्य, तमाशा, बतावणी, लावणी, वासुदेव भोपी पारंपरिक जागरण गोंधळ लोकगीत सादर करण्यात आली.

लोककलावंतानी केली कला सादर

यावेळी सुरगाणाचे मोहनराव गांगुर्डे रामदास वाघरे यादवराव भोये भास्करराव पवार हे उपस्थीत होते यावेळी आखील भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विश्वास कांबळे महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर शाहिर बाळासाहेब भगत, शाहिर बाळासाहेब भवर पाटील, कवी नवनाथ काळे शंकरराव जाधव, भाऊसाहेब मोकळ, बाळासाहेब रुडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन तात्यामहाराज भोये यांनी केले होते.

लोककलावंताच्या मागण्या..शासनाने लक्ष द्यावे....

या मेळाव्यात लोक कलावंताचे मानधन रुपये पाच हजार पर्यंत करावे शासनाने लोक कलावंतान शासकीय कोठ्यातून सद्नीका द्याव्यात, शासनाने लोककलावंतासाठी पाच लाखापर्यंत मेडिक्लेम पॉलीसी काढावी जेणेकरुन त्यांना आजारपणात उपचार करता येईल. लोककलावंतांच्या मुलांसाठी प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत द्यावे. नाशिकमध्ये लोककला विद्यापीठ स्थापन करावे. जेणेकरुन नव्या पिढी आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील पारंपारिक शाहिरी आणि लोककलेचा सांस्कृतिक शिक्षण प्राप्त होईल. शाहिर, लोककलावंत, तमाशा कलावंत, लावणी सम्राज्ञी, लावणी कलावंत लोकनाट्य कलावंत विविध पारंपरिक लोक कला सादर करणारे लोक कलावंत यांना सांस्कृतीक मंत्रालयाकडून कलावंत म्हणून ओळखपत्र अधिकृत द्यावी. लोक कलावंत याना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी महाराष्ट्र्भर देशभर त्यांचे सर्व संच कलकरासह फिरावे लागते. त्यांना बस भाड्यात आणि रेल्वे भाड्यात ७५ टक्के सवलत मिळावी. शाहिर व लोककलावंत यांना वाद्यसंच घेणे व साहित्य घेणे यासाठी दहा लाखापर्यंत शासनाकडून अनुदान देण्यात यावे. या करिता मागण्यात निवेदन आणि एकमुखी मागणीही करण्यात आली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com