राष्ट्रवादीच्या माजी आमदार म्हणतात.."भाजपचे आंदोलन म्हणजे "नाचता येईना अंगण वाकडे'"

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

भारतीय जनता पक्षाचे "माझे अंगण माझे रणांगण' हे महाआघाडी सरकारच्या विरोधातील आंदोलन म्हणजे "नाचता येईना अंगण वाकडे' असे आहे. संकटाच्या काळात एकत्र राहून संकटांना परतवून लावणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे; परंतु सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी केली आहे. 

नाशिक / सटाणा : भारतीय जनता पक्षाचे "माझे अंगण माझे रणांगण' हे महाआघाडी सरकारच्या विरोधातील आंदोलन म्हणजे "नाचता येईना अंगण वाकडे' असे आहे. संकटाच्या काळात एकत्र राहून संकटांना परतवून लावणे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे; परंतु सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजप नेते सैरभैर झाले आहेत, अशी टीका माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे. 

शासनाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न
चव्हाण यांनी, महाविकास आघाडी सरकार कोरोनाविरोधात खंबीरपणे लढत असताना भाजप नेत्यांना घरच्या अंगणात आंदोलन करावे लागत आहे, हेच त्यांचे अपयश आहे. राज्यातील आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व महसूल विभाग हे चांगले काम करीत असताना विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने शासनाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाला हरवणे हे सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राजकारण न करता महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे भाजपने आपली ताकद उभी करावी व कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला परतवून लावण्यासाठी शासनाला सहकार्य करावे अन्यथा महाराष्ट्राची जनता भाजप नेत्यांना कधीही माफ करणार नाही. ही वेळ राजकारण करण्याची नसून त्याऐवजी सर्वांनी कोरोनाला हरविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले. 

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

हेही वाचा > ह्रदयद्रावक! घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former NCP MLA Deepika Chavan accuses BJP nashik marathi news