साहस, संघर्ष, संकल्प..सारे मातृभूमीसाठी...तब्बल ४६ तरुण एका वेळी सैन्यात दाखल!

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

तरुणांचा लष्कराकडे जाण्याचा ओढा व त्यातून देशाच्या संरक्षणासाठी सहभागी होण्याचा हा प्रसंग दुर्मिळ असा ठरला. अर्थात त्यासाठी हिसवळचे प्रा. ज्ञानेश्‍वर बोगीर यांचे मार्गदर्शनही सहाय्यभूत ठरले आहे. प्रा. बोगीर नांदगाव तालुक्‍यातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी कृषिवल नावाने प्रशिक्षण संस्था चालवीत आहेत. विविध परीक्षा, स्पर्धांसाठी ग्रामीण भागातील तरुणांना येणारे अपयश लक्षात घेता नांदगावसारख्या भागात पाच वर्षांपासून बोगीर यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिक : भारतीय लष्कराच्या भरतीसाठी नुकत्याच झालेल्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातून एकट्या नांदगाव तालुक्‍यातील थोडे थोडके नव्हे, तर तब्बल 46 तरुणांना संधी मिळाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तालुक्‍यातील तरुण लष्करात दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

मातृभूमीविषयीचे विलक्षण, उत्कट प्रेम​..हा प्रसंग दुर्मिळ...

तरुणांचा लष्कराकडे जाण्याचा ओढा व त्यातून देशाच्या संरक्षणासाठी सहभागी होण्याचा हा प्रसंग दुर्मिळ असा ठरला. अर्थात त्यासाठी हिसवळचे प्रा. ज्ञानेश्‍वर बोगीर यांचे मार्गदर्शनही सहाय्यभूत ठरले आहे. प्रा. बोगीर नांदगाव तालुक्‍यातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी कृषिवल नावाने प्रशिक्षण संस्था चालवीत आहेत. विविध परीक्षा, स्पर्धांसाठी ग्रामीण भागातील तरुणांना येणारे अपयश लक्षात घेता नांदगावसारख्या भागात पाच वर्षांपासून बोगीर यांचे प्रयत्न सुरू आहेत. 19 जानेवारीला मुंबईला भारतीय लष्करातील भूदलासाठी लेखी परीक्षा झाली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात एकट्या नांदगाव तालुक्‍यातील जवळपास 46 तरुण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

यंदा पहिल्यांदा एवढ्या संख्येपर्यंत हा आकडा वाढला.

दर रविवारी नांदगाव येथील मविप्र महाविद्यालयाच्या मैदानावर मोफत शारीरिक चाचण्यांसोबतच अन्य कवायती व लष्करी सराव करून घेतला जातो. प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल यांचे त्यासाठी मोठे सहकार्य या मुलांना लाभते. गेल्या पाच वर्षांपासून लष्कर भरतीसाठी असे प्रयत्न सुरू असून, दर वर्षी किमान वीसपेक्षा जास्त मुलांना आतापर्यंत भूदल सेवेत दाखल होण्याची संधी मिळालेली आहे. यंदा मात्र पहिल्यांदा 46 एवढ्या संख्येपर्यंत हा आकडा वाढला. शाश्‍वत नोकरी म्हणून लष्कराकडे तरुणांचा कल वाढला असला तरी त्यासाठीचे परिश्रम व अचूक मार्गदर्शन यामुळे नांदगाव तालुक्‍यातील लष्कराच्या सेवेतील तरुणांचा आकडा मात्र वाढला आहे. 
 

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forty six young men Of Nandgaon entered the army at one time Nashik Marathi News