धक्कादायक! अंडी खातांना आता 'ते' दहा वेळा विचार करणार; वाचा काय घडले?

प्रमोद दंडगव्हाळ
Friday, 18 September 2020

अंडी खाण्याचा मोह झाला अनावर. रात्री जाऊन दुकानातून ते अंडी पण घेऊन आले. गॅसवर अंडीही उकडतं टाकली. मात्र दोन तास होऊनही अंडी उकडेना. अंडी खोलून बघितली असता धक्काच. काय घडले वाचा...

नाशिक : (सिडको) अंडी खाण्याचा मोह झाला अनावर. रात्री जाऊन दुकानातून ते अंडी पण घेऊन आले. गॅसवर अंडीही उकडतं टाकली. मात्र दोन तास होऊनही अंडी उकडेना. अंडी खोलून बघितली असता धक्काच. काय घडले वाचा...

अशी आहे घटना

'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' मात्र एका जणाला अंडी खाणे जरा महागातच पडले आहे. उत्तमनगर येथील शिवपुरी चौकातील रहिवासी सचिन परदेशी यांनी बुधवारी (ता. १६) रात्री किराणा दुकानातून अंडी आणली. अंडी उकडायला ठेवली असता दोन तासांनंतरही पूर्ण उकडली गेली नाहीत. त्यानंतर त्यांनी अंडी खाल्ली. काही वेळात त्यांना पोटात त्रास जाणवू लागला. अंड्यांच्या आतमध्ये बघितले असता त्यात त्यांना प्लॅस्टिकसदृश पदार्थ आढळला. ही अंडी जाळून बघितली असता त्यातून दुर्गंधीयुक्त वास येत होता. या प्रकरणी परदेशी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

'जाणकारांकडून' सोशल मीडियावर असाही प्रचार

खाण्यापिण्यामध्ये प्लास्टिकच्या घटकांचा समावेश आहे, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. शरीराला पोषक असलेल्या काही अन्नपदार्थांच्या सेवनावर यामुळे मर्यादा येतात. यासंदर्भात योग्य प्रकारची माहिती कुणाकडून घ्यायची याबद्दल सर्वसामान्यांना ज्ञान नसते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. 'प्लास्टिकची अंडी सापडली आहेत. हे अंडे खाण्यापूर्वी पाण्यामध्ये जरुर ठेवा, जर ते प्लॅस्टिकचे असेल तर ते पाण्यात बुडेल, त्यांचा रंगही बदलेल,' असाही प्रचार 'जाणकारांकडून' सोशल मीडियावर केला जात होता.

पुन्हा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

'एनसीसीसी' या राष्ट्रीय अंडी समन्वय समितीनेही ही माहिती खोटी असल्याचे स्पष्टही केले होते. तसेच प्लास्टिकची अंडी विकणे सुरू केले तर अंडीविक्रीचा व्यवसाय पूर्णपणे तोट्यात जाईल कारण उत्पादकाला ही किंमत परवडणारी नाही, अंड्यांच्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होऊन त्याचा खप पूर्णपणे खाली येईल, त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे समितीने स्पष्ट केले होते. मात्र आता प्लास्टीकसदृश गोष्ट अंड्यांमध्ये सापडल्याने पुन्हा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Found in Uttamnagar Plastic eggs nashik marathi news