प्रवाश्यांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त चार विशेष गाड्या; वाचा सविस्तर 

अंबादास शिंदे
Wednesday, 16 September 2020

मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त चार विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी गुरुवार (ता. १७)पासून सुटणाऱ्या विशेष गाड्या फक्त आरक्षित राहतील.

नाशिक रोड : मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त चार विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी गुरुवार (ता. १७)पासून सुटणाऱ्या विशेष गाड्या फक्त आरक्षित राहतील. गाडी क्रमांक ०१०५५/०१०५६ अप-डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष गाडी, ०१०५९/०१६०६० अप-डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस- छपरा विशेष गाडी सुरू होत असून, त्यांना नाशिकला थांबा देण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त चार विशेष गाड्या 

रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी गुरुवार (ता. १७)पासून सुटणाऱ्या विशेष गाड्या फक्त आरक्षित राहतील. गाडी क्रमांक ०१०५५ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष गाडी शुक्रवार (ता. १८)पासून दर सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी व रविवारी कुर्ला स्थानकावरून दहा वाजनू ५५ मिनिटांनी रवाना होईल. दुसऱ्या दिवशी गोरखपूरला पोचेल. गाडी क्रमांक ०१०५६ अप गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रविवार (ता. २०)पासून दर मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी, रविवारी गोरखपूरहून सहा वाजून २० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला सव्वाचारला पोचेल. गाडी क्रमांक ०१०५९ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस- छपरा विशेष गाडी गुरुवार (ता. १७)पासून दर मंगळवारी, गुरुवारी, शनिवारी कुर्ला स्थानकावरून सहा वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी छपराला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी पोचेल. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

नाशिक, भुसावळ येथे थांबा
गाडी क्रमांक ०१०६० अप छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी शनिवार (ता. १९)पासून दर गुरुवारी, शनिवारी, सोमवारी छपरा स्थानकावरून सुटेल. दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला चार वाजून १५ मिनिटांनी पोचेल. या गाड्यांना नाशिक, भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four additional special trains by Central Railway nashik marathi news