आयुक्तांची माहिती...'या' महानगरपालिकेत भरणार चारशे कंत्राटी पदे!

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 10 June 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना साथरोग नियंत्रणासाठी तद्य डाँक्टरांसह, भुलतद्य, वैद्यकीय अधिकारी, परिचारीकांची चारशे चार कंत्राटी पदे करार पध्दतीने भरण्यात येणार आहे. ही माहिती आयुक्तांनी दिली. 

नाशिक / मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोरोना साथरोग नियंत्रणासाठी तद्य डाँक्टरांसह, भुलतद्य, वैद्यकीय अधिकारी, परिचारीकांची चारशे चार कंत्राटी पदे करार पध्दतीने भरण्यात येणार आहे. ही माहिती आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चारशे कंत्राटी पदे भरणार.
कोविड साथरोगाच्या अंमलबजावणीसाठी ही पदे भरण्यात येत आहे. एमडी मेडिसीन डाँक्टर 14, भुलतद्य 8, एमबीबीएस डाँक्टर 76 अशी पदे आहेत. याशिवाय बीएएमएस व बीयुएमएस 96 डाँक्टर, 186 परिचारिका व 24 एएनएम च्या जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना मनपा आरोग्य विभागात मुळ कागदपत्रांसह थेट उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 75 हजार ते 17 हजार रूपये मानधन पदानुसार देण्यात येणार आहे.

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

मालेगावमध्ये अजून टळला नाही धोका
काहींच्या मते सर्वदूर फैलावामुळे हर्ड इम्युनिटी किंवा समूह प्रतिकारशक्‍ती तयार झाली व त्यामुळे विषाणू काहीसा कमजोर झाला. असे असले तरी धोका अजून टळलेला नाही. विशेषत: अतिजोखमीचे रुग्ण, लहान मुले व वृद्धांना सांभाळणे, त्यांना बाधा न होऊ देणे व अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे. 
अर्थात, कागदोपत्री सारे काही आलबेल दिसत असले तरी मालेगाव शहर एका भयंकर अनुभवातून गेले आहे. नागरिकांनी वैद्यकीय उपचारात काही जुगाड केले. काहींना लागण होऊन ते बरेही झाले, मात्र स्वॅब दिले गेले नसल्याने अशा रुग्णांची नोंद झाली नाही. तरुण वयोगटातील असे अनेक रुग्ण बरे झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. गेल्या 15 दिवसांत पूर्वेच्या तुलनेत पश्‍चिम भागातील रुग्णांची संख्या वाढली. मालेगावात सध्या 83 ऍक्‍टिव्ह पेशंट आहेत. त्यात पश्‍चिम भागातील 90 टक्के रुग्णांचा समावेश आहे. पश्‍चिमेकडील संगमेश्‍वर, कॅम्प, श्रीरामनगर, सोयगाव, भायगाव नववसाहत यासह द्याने परिसरात रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. संगमेश्‍वर व द्याने हे तर नव्याने हॉटस्पॉट बनले आहेत. 

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four hundred contract posts will be filled malegaon nashik marathi news