शेतकऱ्यांनो सावधान! जरा जपून टाका पाऊल; दोन महिन्यात मृत्यूच्या अनेक घटना

farmer 3.jpg
farmer 3.jpg

नाशिक / कळवण : शेतकऱ्यांना शेतात काम करण्याबरोबरच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला, की संबंधित शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते.

नऊ लोकांचा मृत्यू

पावसाळ्यात शेतकामांना वेग येतो, मात्र याचबरोबर सर्पदंश होण्याचे प्रमाणही वाढते. मागील तीन महिन्यांत ४०५ जणांना सर्पदंश झाला असून, यामध्ये नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांना शेतात काम करण्याबरोबरच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला, की संबंधित शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यावर मृत्यूही ओढवतो. अशा अनेक घटना मे ते जुलै या कालावधीत घडल्या आहेत.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना

पावसाळा सुरू झाल्यानंतर मे ते सप्टेंबर या महिन्यांत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बाहेर निघून सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते. 
जिल्ह्यात बहुतांश लोकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वतःचे संरक्षण करणे कठीण जाते. यातूनच दर वर्षी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना जुलै महिन्यात घडल्याच्या नोंदी सर्पोपचार रुग्णालयात आहेत. 
 

सर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून त्यावर आवश्यक असलेली लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली आहे. तरीही सर्पदंश होताच तत्काळ रुग्णालय गाठावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. -डॉ. अनंत पवार, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी, नाशिक 

 

रुग्णालयनिहाय दंशसंख्या 
रुग्णालय -मे -जून -जुलै 
वणी -१९ -९ -२६ 
सटाणा -११ -२ -१४ 
गिरणारे -४ -० -० 
मनमाड -४ -१० -० 
घोटी -१४ -१४ -६५ 
इगतपुरी -२ -६ -८ 
त्र्यंबक -१० -० -० 
निफाड -१ -१३ -० 
दोडी बुद्रुक -१ -० -० 
दाभाडी -१ -२ -२ 
पेठ -१० -१२ -१८ 
नगरसूल -१ - -० 
कळवण -१० -२८ -३८ 
उमराणे -० -१ -० 
दिंडोरी -० -१० -१० 
मालेगाव -० -८ -० 
येवला -० -१ -१० 
डांगसौंदाणे -० - ४ 
एकूण ः ८५ -१२९ -१९१  
हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com