esakal | देवळ्यात चार दुकाने फोडली; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
sakal

बोलून बातमी शोधा

crime3.jpg

कालांतराने सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर गुन्हेगारांचे फावले व चोरीच्या घटनांत पुन्हा वाढ होऊ लागली. सीसीटीव्ही यंत्रणेची दुरुस्ती व देखभाल कोणी करायची, यावरून देवळा नगरपंचायत व पोलिस प्रशासनात वाद सुरू झाला. त्यात सीसीटीव्ही यंत्रणा बळी पडली ती पुन्हा सुरूच झाली नाही. 

देवळ्यात चार दुकाने फोडली; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

sakal_logo
By
योगेश सोनवणे

नाशिक : (देवळा) येथे मंगळवारी (ता. २२) पहाटे चार दुकानांचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. दुकानात चोरी करतानाचे चोराचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, देवळा पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. 

असा आहे प्रकार

पहाटे दीडच्या सुमारास देवळा-कळवण रस्त्यावरील देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हिरे ऑटो, आनंद ॲग्रो, ओम श्री हार्डवेर, बी.व्ही.के. गोडाउन या दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने हजारो रुपये किमतीचे सामान व रोकडे चोरून नेली. या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे चोरी करतानाचे चोरट्याचे फुटेज पोलिसांना मिळाले असून, चोरट्याचा शोध घेत आहेत. 

शहरातील कॅमेरे वादात 

देवळा शहरात पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत सीसीटीव्ही यंत्रणा बसविली. यामुळे पोलिस यंत्रणा सजग असल्याचे व शहरातील रोडरोमिओंना, तसेच चोरीच्या घटनांना आळा बसू लागल्याचे चित्र सुरवातीला दिसू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता; परंतु कालांतराने सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर गुन्हेगारांचे फावले व चोरीच्या घटनांत पुन्हा वाढ होऊ लागली. सीसीटीव्ही यंत्रणेची दुरुस्ती व देखभाल कोणी करायची, यावरून देवळा नगरपंचायत व पोलिस प्रशासनात वाद सुरू झाला. त्यात सीसीटीव्ही यंत्रणा बळी पडली ती पुन्हा सुरूच झाली नाही. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

चोराने राजरोसपणे आमच्या दुकानांवर डल्ला मारला. आमच्याबाबत जे झाले ते परत होऊ नये, कारण व्यापाऱ्यांना कोणी वाली नाही, त्यांना ना नुकसानभरपाई मिळते, ना सरकारची मदत म्हणून रात्रीची गस्त वाढवत नागरिकांना दिलासा द्यावा. - पप्पू हिरे, संचालक, हिरे ऑटो, देवळा 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

संपादन - किशोरी वाघ