esakal | नवरात्रोत्सवामुळे दरवळतोय फुलांचा सुगंध! फुलबाजारात लाखोंची उलाढाल 
sakal

बोलून बातमी शोधा

flower market.jpg

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने भाविकांसाठी मंदिरांचे दरवाजे उघडण्यास परवानगी दिली नसली तरी गणेशवाडीतील फुलबाजारात फुलांचा सुगंध दरवळू लागला असून, रोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. 

नवरात्रोत्सवामुळे दरवळतोय फुलांचा सुगंध! फुलबाजारात लाखोंची उलाढाल 

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने भाविकांसाठी मंदिरांचे दरवाजे उघडण्यास परवानगी दिली नसली तरी गणेशवाडीतील फुलबाजारात फुलांचा सुगंध दरवळू लागला असून, रोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. 

फुलबाजार चांगलाच बहरला; रोज लाखोंची उलाढाल
सराफ बाजारात भरणाऱ्या नाशिकच्या पारंपरिक फुलबाजाराचे सात महिन्यांपूर्वी गणेशवाडी परिसरातील नवीन जागेत स्थलांतर झाले. त्या वेळी याठिकाणी फुलबाजार यशस्वी होऊच शकणार नाही, असे चित्र काही विक्रेत्यांपुढे उभे केले होते. अवघ्या सहा महिन्यांच्या आत येथील फुलबाजार चांगलाच बहरला असून, रोज लाखोंची उलाढाल होत आहे. पितृपक्षानंतर आलेला अधिकमास व त्यानंतरच्या नवरात्रोत्सवामुळे बाजारात चैतन्य आले आहे. सध्या बाजारात शेवंती, निशिगंध, गुलाब, लिली आदींची मोठी आवक होत असून, झेंडू, शेवंतीला मोठी मागणी आहे. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

अद्याप मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती
शहराच्या परिसरातील नागापूर, माडसांगवी, मखमलाबाद, जानोरी, मोहाडी, अवनखेड, दिंडोरी, म्हसरूळ, आडगावसह परिसरातील गावातून शेतकरी फुले विक्रीसाठी आणतात. याशिवाय शहरालगतच्या तपोवन, हिरावाडी परिसरातही अद्याप मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. त्यामुळे कधीकाळी पाच-पन्नास विक्रेते या बाजारात येत. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

फुले भाव (किलोप्रमाणे पैसे) 
शेवंती १६० ते १८० 
झेंडू ६० ते ८० 
निशिगंध २०० ते २४० 
जरबेरा ५० रुपये बंडल 
गुलाब जुडी १० ते २० 
लिली बंडल १५ ते २० 


पावसामुळे इतर पिकांसारखेच फूलशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र नवरात्रोत्सवामुळे फुलांना चांगला भाव मिळत असल्याचे समाधान आहे. 
-मच्छिंद्र आडके, शेतकरी,  


परतीच्या पावसामुळे फूलशेतीचे नुकसान झाले असले तरी गुलाबासह झेंडूला चांगली मागणी आहे. सणावारामुळे फुलांना चांगली मागणी आहे. 
-गणेश डोके, फूल विक्रेता  

संपादन - ज्योती देवरे