सावध व्हा! शेतजमिनीचे व्यवहार करत असाल तर जपून; गंडा घालणारी टोळी सक्रीय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरेश नागरे यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक : शेतजमिन खरेदी करत असाल तर सावधान...एकाच शेतजमिनीचे अनेकांना साठेखत करुन लाखोंची फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाली आहे. यात पुरुषांबरोबरच महिलादेखील सहभागी आहेत. अशीच एक घटना जिल्ह्यात घडली. या टोळीतील महिला व पुरुषाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांलाच फसविल्याची बाब उघडकीस आली आहे.  

अशी आहे घटना

महेश (सुनील) किसन वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोटी येथे राहाणारा सुरेश पांडुरंग नागरे याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथील सुमारे दीड हेक्टर जमीन विक्री करायची असल्याचे सांगून त्यापोटी एक लाख रुपये रोख घेतले. या जमिनीचा व्यवहार १३ लाख रुपयात ठरला. व्यवहार पूर्ण करून खरेदीखत करून देण्याचे ठरलेले असताना नागरे याने एक लाख रुपये घेतल्यानंतर खरेदी करून देण्यासाठी टाळाटाळ केली. मात्र त्याचवेळी त्याची साथीदार असलेली सुरेखा शहा (रा. सातपूर) हिच्याशी संगनमत करून सदर शेतजमिनीचे साठेखत शहा यांना करून दिले व वाजे यांची फसवणूक केली. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरेश नागरे यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नागरेची साथीदार सुरेखा शाह ही फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. यांच्या संबंधित कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in agricultural land transactions nashik marathi news