दागिने पॉलिश करणे पडले महागात; सुंदराबाईंना बसला चांगलाच फटका

प्रमोद सावंत
Saturday, 7 November 2020

२० ते २५ वयोगटातील दोघा तरुणांनी कंपनीची पावडर विक्रीसाठी आल्याचे सांगत तांबे, पितळीची भांडी, चांदीचे देव तसेच दागिने पॉलिश व स्वच्छ करून देण्याची बतावणी केली. सुंदरबाईंनी त्यांच्याकडील ऐंशीभार चांदीचे गोठ, दंडकडे व बेले दिले. दोघांनी दागिन्यांना लाल रंगाचे काहीतरी औषध लावले. त्यानंतर सुंदरबाईंना याचा चांगलाच फटका बसला. काय घडले नेमके वाचा..

मालेगाव (जि.नाशिक) :  दोघा तरुणांनी कंपनीची पावडर विक्रीसाठी आल्याचे सांगत तांबे, पितळीची भांडी, चांदीचे देव तसेच दागिने पॉलिश व स्वच्छ करून देण्याची बतावणी केली. सुंदरबाईंनी त्यांच्याकडील ऐंशीभार चांदीचे गोठ, दंडकडे व बेले दिले. दोघांनी दागिन्यांना लाल रंगाचे काहीतरी औषध लावले. त्यानंतर सुंदरबाईंना याचा चांगलाच फटका बसला. काय घडले नेमके वाचा..

दागिने पॉलिश करणे पडले महागात; सुंदराबाईंना बसला फटका

२० ते २५ वयोगटातील दोघा तरुणांनी कंपनीची पावडर विक्रीसाठी आल्याचे सांगत तांबे, पितळीची भांडी, चांदीचे देव तसेच दागिने पॉलिश व स्वच्छ करून देण्याची बतावणी केली. सुंदरबाईंनी त्यांच्याकडील ऐंशीभार चांदीचे गोठ, दंडकडे व बेले दिले. दोघांनी दागिन्यांना लाल रंगाचे काहीतरी औषध लावले. यानंतर दागिने काळे पडले. हे दागिने तुम्हाला धुता येणार नाहीत. आम्ही आमच्या बादलीत धुवून देतो, असे सांगून त्यांच्याकडील बादलीत दागिने ठेवले. काही वेळानंतर दागिने बाहेर काढून त्यांनी त्यांना सफेद रंगाची पावडर लावली. एका कागदात ते गुंडाळले. दोन तास दागिने कागदातच राहू द्या. त्या आधी काढले तर खराब होतील, अशी बतावणी केली. दोन तासांनी सुंदरबाईंनी दागिने पाहिले असता त्यांचे वजन अवघे ४० भारवर आले होते. त्यांनी हा प्रकार मुलगा वाल्मीक यांना सांगितला.

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

चाळीसभार चांदी हातचलाखीने लांबविली.

तालुक्यातील रावळगाव, ओंकारनगर भागातील सुंदरबाई चव्हाण यांना चांदीचे दागिने पॉलिश करून देण्याचे सांगत दोघा भामट्यांनी लुबाडले. दागिन्यांची झीज होणारे द्रव्य टाकून त्यांच्याकडून चाळीसभार चांदी हातचलाखीने लांबविली.भामट्यांनी दागिन्यांना द्रव्य लावून चांदी त्यांच्याकडील बादलीत गाळून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येईपर्यंत दोघा अनोळखी भामट्यांनी गावातून पोबारा केला होता. चव्हाण कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.  

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of polishing jewelry malegoan nashik marathi news

टॉपिकस