दुप्पट रक्कमेच्या अमिषाने दिड लाखांची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

सत्यभामा घुगरे यांना संशय आल्यावर त्या विजया ममता थिएटरजवळील कंपनीच्या कार्यालयात गेल्या तेव्हा कार्यालय बंद दिसले. तेथे लिहिलेले फोनंबरही बंद होते. तेथील नागरिकांना विचारणा केली असता कंपनी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक : (नाशिकरोड) ''कंपनीत दरमहा पैसे गुंतवा अन् सात वर्षात पैसे दुप्पट मिळणार. तुम्ही विश्वास ठेवा, पैसे काय पळून जाताय.'' असं बोलून विश्वास संपादन केला. अन् त्याने चक्क १ लाख ६८ हजार रुपयाचा चुना लावल्याची घटना घडली. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

कंपनीत पैसे गुंतवल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम. असे सांगून एका महिलेची १ लाख ६८ हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. देवळालीगाव धनगर गल्लीतील सत्यभामा शांताराम घुगरे यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये उपनगर सिंधी कालनीतील सविता विलास कुलथे व दत्तमंदिररोड, धोंगडे मळा येथील मधुमती मनोहर बुचुडे यांच्याशी ओळख झाली. त्या वडाळा शिवारातील एचबीएन डेअरी अन्ड अलाईड लिमीटेड कंपनीत काम करत होत्या. या कंपनीत दरमहा पैसे गुंतविल्यास सात वर्षात दुप्पट रक्कम मिळेल असे सांगून घुगरे यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. २००९ पासून २०१६ पर्यंत सात वर्षे दर महिन्याला दोन हजार रुपये कंपनीत भरणा करण्यासाठी कुलथे व बुचूडे घेऊन जात होत्या. आतापर्यंत १ लाख ६८ हजार रुपये घेऊन गेल्या आहेत. सात वर्षे पूर्ण झाल्याने घुगरे यांनी या महिलांना विचारणा केली असता त्यांनी तुमचे पैसे श्रीराम चित्ते (भीमनगर, जेलरोड) यांच्याकडे कंपनीत भरणा करण्यासाठी जमा केले आहेत, असे सांगितले. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

संशय आल्याने झाला भांडाफोड...

सत्यभामा घुगरे यांना संशय आल्यावर त्या विजया ममता थिएटरजवळील कंपनीच्या कार्यालयात गेल्या तेव्हा कार्यालय बंद दिसले. तेथे लिहिलेले फोनंबरही बंद होते. तेथील नागरिकांना विचारणा केली असता कंपनी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी संशयित सविता कुलथे, मधुमती बुचूडे, श्रीराम चित्ते यांच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of Rs 1.5 lakh due to double amount of money nashik marathi news