नोकरीला लावून देतो असे कोणी सांगत असेल तर सावधान! एका बेरोजगाराची अशी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 16 September 2020

सर्व सामान्य बेरोजगार सुशिक्षित तरुणांनी परदेशात नोकरीला लावून देणाऱ्या कंपनीची शहानिशा व खात्री न करताच अनेक तरुण याच्या जाळ्यात अडकतात. नोकरीची गरज आणि बेरोजगारी यामुळे त्रस्त झालेले तरुण आपली वाट शोधत असतात. अशावेळी सुशिक्षित तरुणांकडूनही अशा गोष्टींची शहानिशा केली जात नाही.

नाशिक रोड : सर्व सामान्य बेरोजगार सुशिक्षित तरुणांनी परदेशात नोकरीला लावून देणाऱ्या कंपनीची शहानिशा व खात्री न करताच अनेक तरुण याच्या जाळ्यात अडकतात. नोकरीची गरज आणि बेरोजगारी यामुळे त्रस्त झालेले तरुण आपली वाट शोधत असतात. अशावेळी सुशिक्षित तरुणांकडूनही अशा गोष्टींची शहानिशा केली जात नाही.अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

असा घडला प्रकार

नाशिक रोड परिसरातील दत्तमंदिर रोड आनंदनगर या ठिकाणी टीएमसी शिपिंग प्रशिक्षण केंद्र आहे. या कंपनीत जॉबला लावून देतो. त्यासाठी प्रशिक्षणाला लागणारा खर्च म्हणून माझ्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार २० ऑक्टोबर २०१७ ते आतापर्यंत रोकड व धनादेशाद्वारे नऊ लाख ३० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी मिळेल म्हणून संपर्क साधला असता कंपनीतील सविता दगडू गायकवाड यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फोन बंद करून पैसे देण्यास टाळाटाळ केली.  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिपिंग कंपनीत नोकरीला लावून देतो, म्हणून एका बेरोजगाराची फसवणूक झाली आहे. याबाबत शाहू प्रमोद शिंदे (रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी  तक्रार दिली आहे.  यावरून कंपनी व गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with Unemployed young nashik marathi news