esakal | मरणानंतरही सुख नाहीच! अंबड स्मशानभूमीत रात्रीस खेळ चाले; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

chita 123.jpg

माणूस जिवंत असताना पाणी, रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडीचा त्रास सहन करायला लागत होता. पण आता मेल्यानंतरसुद्धा सुखाने मरण नाही. नाशिकच्या अंबड स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वाचा सविस्तर.. 

मरणानंतरही सुख नाहीच! अंबड स्मशानभूमीत रात्रीस खेळ चाले; वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : माणूस जिवंत असताना पाणी, रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडीचा त्रास सहन करायला लागत होता. पण आता मेल्यानंतरसुद्धा सुखाने मरण नाही. नाशिकच्या अंबड स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वाचा सविस्तर.. 

मरताना तरी सुखाने पाणी जाऊ द्या तोंडात...

अंबड येथील धोंडीराम सखाराम दातीर यांचे अल्पशा आजाराने वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. मंगळवारी (ता. रात्री अंबड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यासाठी आणले. यावेळी कमी प्रमाणात आप्तस्वकीय जमले होते. परंतु जेव्हा तेथे सर्वजण पोहोचले तेव्हा तेथील लाईटच सुरू होत नव्हते. अशावेळी सर्वांना प्रश्न पडला तो आता काय करायचे ? त्यावर उपस्थित सर्वांनी आप आपल्या खिशातील मोबाईल काढून मोबाईलच्या प्रकाशामध्ये अंतिम संस्कार करावे लागले. तेथे उपस्थित असलेल्या माजी नगरसेवकाने संबंधित विद्युत कर्मचाऱ्याला फोन लावून लाईट लावण्याचे विनंती केली. परंतु तोपर्यंत अग्नी डाग देण्यात आला होता असे उपस्थिताचे म्हणणे आहे. शेवटी काय तर महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे मूर्तिमंत उदाहरण त्यानिमित्ताने बघायला मिळाल्याची चर्चा अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

एवढा निधी पाण्यात गेला की काय?

मागील वर्षी लाखो रुपये खर्च करून अंबड स्मशानभूमीचे काम करण्यात आले. परंतु हळूहळू त्याच्या उणिवा या निमित्ताने दिसू लागल्या आहेत त्यामुळे खर्च केलेला एवढा निधी पाण्यात गेला की काय? अशी चर्चा यानिमित्ताने नागरिकात होऊ लागली आहे. दुसऱ्या दिवशी अंबड स्मशानभूमी जवळील विद्युत पोलवरील लाईटाचे काम करताना विद्युत कर्मचारी प्रतिक्रिया गावातील एका वृद्ध व्यक्तीचे निधन झाले होते . अशावेळी आम्ही मोजकेच लोकं अंबड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीसाठी गेलो होतो . परंतु त्या ठिकाणी लाईट नव्हती. अखेर मोबाईलच्या प्रकाशात आम्हाला अंत्यसंस्कार करावे लागले.

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

एकीकडे शहरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असताना त्याकडे कानाडोळा केला जात असतानाच स्मशानभूमीसाठी महापालिका आपल्या अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतुद करते. पण प्रत्यक्षात मात्र स्मशानभूमीमध्ये विविध बाबींचा ठणाणा आहे.. - उत्तम दोंदे, माजी नगरसेवक, अंबड

संपादन - ज्योती देवरे