"कर्करोगावर प्रभावी औषध घ्या" रामबाण इलाज मिळणार म्हणून लोकांनी भावनेत विश्वास ठेवला...अन्......

cancer consult.jpg
cancer consult.jpg

नाशिक : कर्करोगावर प्रभावी औषध देण्याच्या बहाण्याने रुग्णांच्या नातलगांना गंडा घालणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीला जेरबंद केले. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली असून, प्राथमिक तपासात संशयितांनी राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातही अनेकांना लाखोंना गंडा घातल्याचे समोर आले आहे. 

असा घडला प्रकार...

पद्मा पगार (रा. पारिजातनगर, नाशिक रोड) यांच्या पतीस कर्करोग असल्याने त्यांच्यावर शहरातील मानवता क्‍यूरीत उपचार सुरू होते. डिसेंबर 2019 मध्ये त्यांना कृष्णा नावाचा संशयित भेटला. त्याने भावनिक होत, माझ्या वडिलांनाही कर्करोग होता. मात्र त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार केल्याने ते ठीक झाल्याचे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून पगारही आयुर्वेदिक उपचार करण्यास तयार झाल्या. संशयिताने त्यांना सुरवातीला 26 हजार रुपये घेत आयुर्वेदिक औषध दिले. मात्र त्यानंतर ते औषध खराब न होण्यासाठी व त्यांच्या पतीला वाचविण्यासाठी आणखी दहा लाखांची मागणी करीत पैसे उकळले. मात्र पैसे दिल्यानंतरही औषध न दिल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानुसार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल होता. गोविंदा दुर्गा वरगट्टी, गोविंदा जिरप्पा मल्लापल्लू (दोघे रा. बंजारवाडी, मानखुर्द, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी नाशिक, पुणे, मालाड, ठाण्यासह गुजरातमधील वापीतही अनेकांना गंडा घातला.

विश्‍वास संपादन केल्यानंतर​ ते...
संशयित दोघे एखाद्या शहरात गेल्यानंतर एक गाळा भाड्याने घेत आणि त्याठिकाणी आयुर्वेदिक औषध विक्रीसाठी ठेवत. दुसरा संशयित शहरातील रुग्णालयांमध्ये फिरून कर्करोग व तत्सम आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या नातलगांना हेरून त्यांना आयुर्वेदिक औषध उपचाराचा सल्ला द्यायचा. रुग्णाच्या नातलगांचा विश्‍वास संपादन केल्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळून ठराविक दिवसात ते शहरातून पसार व्हायचे. अशी या दोघा संशयितांची गंडा घालण्याची पद्धत होती. पहिल्यांदा आयुर्वेदिक औषधांचे पैसे नाममात्र घ्यायचे आणि नंतर ते औषधे व अधिकची औषधे न घेतल्यास रुग्ण दगावेल, अशी भीती घालून त्यातून ते पैसे उकळणे हाच त्यांचा एकमेव फंडा होता. 

गुन्हे शाखेकडून बारकाईने अभ्यास 
शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी या गुन्ह्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करीत छडा लावला. त्यानुसार सतत 20 ते 25 दिवस गुन्ह्याच्या मागे लागत संशयितांपर्यंत ते पोचले. अखेर दोन संशयितांना मुंबईतून अटक केली. सखोल चौकशीत त्यांनी नाशिकसह अन्य जिल्ह्यांमधील रुग्णांच्या नातलगांनाही गंडा घातल्याचे उघडकीस आले. संशयितांकडून पोलिसांनी 45 हजार रुपये जप्त केले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दिनो खैरनार, पुष्पा निमसे, उपनिरीक्षक बलराम पालकर, सहाय्यक उपनिरीक्षक पोपट कारवा, ळवसंत पांडव, अनिल दिघोळे, संजय मुळक, प्रवीण कोकाटे, विशाल देवरे यांनी बजावली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com