esakal | मुली-महिला विक्री रॅकेटचा गंभीर प्रकार! विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टोळीचा पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

woman 1234.jpg

फूस लावून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींसह दोन महिलांची सातपूर पोलिसांनी सुटका केली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचे विक्रीसाठीच अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे.

मुली-महिला विक्री रॅकेटचा गंभीर प्रकार! विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टोळीचा पर्दाफाश

sakal_logo
By
सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : फूस लावून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींसह दोन महिलांची सातपूर पोलिसांनी सुटका केली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचे विक्रीसाठीच अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. किरणपाल विजेंद्र सिंग (रा. उत्तर प्रदेश) व माया सानप यासह मुलींची विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली. 

राजस्थानात मुली विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 
पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह विकलेल्या दोन महिलांची सुटका केली. त्यामुळे नाशिकला मुली-महिला विक्री रॅकेटचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना सातपूर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेतले, अशी माहिती सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, राकेश हांडे यांनी दिली. सातपूर परिसरातून अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण केले होते. घटनेचे गांभीर्य ओळखत आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मगर, सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे, पोलिस उपनिरीक्षक शांतिलाल चव्हाण, हवालदार मनोहर सूर्यवंशी, डी. के. पवार, राजेंद्र घुमरे, पोलिस नाईक सागर कुलकर्णी, विनायक आव्हाड, जावेद शेख आदींच्या पथकाने माग काढत गुप्त माहितीनुसार राजस्थान, गुजरातमध्ये तपास केला. तेथे पैसे घेऊन लग्नासाठी मुली विकण्याच्या टोळीची उकल झाल्यावर पोलिसांनी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका केली.

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

फसविलेल्या अल्पवयीन मुलीची राजस्थानमधून सुखरूप सुटका 

यात पोलिस अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे विक्री केलेल्या दोन महिलांचीही सुटका करत किरणपाल विजेंद्र सिंग (रा. उत्तर प्रदेश) व माया सानप यासह मुलींची विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ