लॉकडाऊन शिथिलतेनंतर गुंड टोळ्या सक्रिय! अक्षरश: घरात घुसून हत्यारे नाचवत धिंगाणा

विनोद बेदरकर
Tuesday, 27 October 2020

लॉकडाऊन शिथिलतेनंतर अनेक गुंड टोळ्या सक्रिय झाल्या असून सहा ते सात जणांच्या टोळक्याने एका घरात घुसून हत्यारांनी घरात तोडफोड करून दहशत पसरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नाशिक : लॉकडाऊन शिथिलतेनंतर अनेक गुंड टोळ्या सक्रिय झाल्या असून सहा ते सात जणांच्या टोळक्याने एका घरात घुसून हत्यारांनी घरात तोडफोड करून दहशत पसरवल्याचा प्रकार पंचवटीतील पेठरोड परिसरात सोमवारी सकाळी घडला.

घरात बळजबरी प्रवेश करत धिंगाणा

सर्व संशयित पिडीतेच्या भावाच्या ओळखीचे असून काही वादातून या सर्वांनी त्यांच्या घरात बळजबरी प्रवेश करून पिस्तुल, कोयते, चाकू अशी हत्यारे उगारून जाधव कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड करत कोयता दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हे सर्व सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

पोलीसांत तक्रार दाखल
प्रशांत अशोक जाधव (27, श्रीधर कॉनी, म्हसरूळ), योगेश प्रल्हाद लांबडे (24, जकात नाका, म्हसरूळ), रोहन प्रभाकर निकम (28, टाकळीरोड, जयभवानीनगर), अंकुश भुषण सोनवणे (25, बोधलेनगर), मयुर विवेकांनद वाघमारे (23, दत्तमंदिर कॉलनी, उपनगर), जतीन दिलीप साळुंके (18, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सोनी जाधव (रा. पेठरोड, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gangs activate after lockdown nashik marathi news