गुंडाची जेलमधून सुटका आणि समर्थकांचा मेळा; काही काळ वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 2 October 2020

गुंडाची​ जेलमधून सुटका होणार म्हणून समर्थक खूश होते. जेलबाहेर अगदी तो थक्क करणारा गोतावळा...शंभर गाड्या आणि प्रचंड गर्दी..असे एकूण सिनेमात जसे पाहतो तसे हुबेहुब दृश्य नाशिकरोडच्या जेलबाहेर गुरुवारी पाहायला मिळाले. काय घडले वाचा...

नाशिक : गुंडाची जेलमधून सुटका होणार म्हणून समर्थक खूश होते. जेलबाहेर जमणारा गोतावळा...शंभर गाड्या आणि प्रचंड गर्दी..असे एकूण सिनेमात जसे पाहतो तसे हुबेहुब दृश्य नाशिकरोडच्या जेलबाहेर गुरुवारी पाहायला मिळाले. काय घडले वाचा...

भाईच्या स्वागतासाठी पंटर लोकांचा गोतावळा

ठाण्यातील कुख्यात गँगस्टर आणि सोशल मीडियाभाई सिद्धेश अभंगे (वय २८) याची गुरुवारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. त्याच्या समर्थकांनी शंभरावर वाहने आणून प्रचंड गर्दी केल्याने जेलरोडची वाहतूक ठप्प झाली होती. कारागृह प्रशासनाने त्यांना शिस्त पालन व शांततेबाबत सूचना केली. सिद्धू अभंगे एका मंत्र्याचा समर्थक आहे. एमपीडी कायद्यांतर्गत ठाणे पोलिसांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करीत नाशिकरोडच्या कारागृहात २ ऑक्टोबर २०१९ रोजी पाठवले होते. त्याची गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास सुटका होणार असल्याने ठाण्याहून प्रचंड संख्येने त्याचे समर्थक आले होते.कुख्यात गँगस्टर आणि सोशल मीडियाभाईची गुरुवारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली.त्याला घेऊन जाण्यासाठी समर्थकांनी शंभरावर वाहने आणून प्रचंड गर्दी केल्याने जेलरोडची वाहतूक ठप्प झाली होती. असा सिनेस्टाईल प्रसंग पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. 

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

सिद्धेशवर विविध गुन्हे दाखल

खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणे, दहशत निर्माण करणे, अमली पदार्थांची तस्करी आदी गुन्ह्यांमध्ये सिद्धेशविरुद्ध ठाण्यातील कोपरी, चितळसर, वर्तकनगर आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो यू ट्यूबचा भाई म्हणून कुख्यात आहे. त्याला याआधी तडीपारही करण्यात आले होते. सामाजिक संस्था चालविणारा सिद्धू नेहमी गाड्याच्या ताफ्यात फिरत असतो. ठाणे रेल्वे पार्किंगचे ठेके त्याच्याकडे आहेत.

>>> नाशिकच्या महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पंटर्सचा जल्लोष न करता काढता पाय

त्यांनी कारागृहाच्या आवारात प्रवेशाचा प्रयत्न करताच अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी त्यांना मुख्य रस्त्यावरच रोखले. कारागृह आवारात येऊ नये, फटाखे फोडू नये, कोणताही गैरप्रकार करू नये, अशी सख्त ताकीद देण्यात आली. यामुळे यू ट्यूब भाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या गँगस्टर सिद्धेश अभंगेच्या पंटर्सने जल्लोष न करता काढता पाय घेतला. वर्दळीच्या रस्त्यावर शंभरावर वाहने, समर्थकांची गर्दी, भाई कारागृहातून कधी बाहेर होणार म्हणून ताटकळत असलेले पंटर, दादागिरीला शोभणारा खास पेहराव, अशी दाक्षिणात्य चित्रपटात दिसणारे दृश्य गुरुवारी नाशिकरोड कारागृहाबाहेर बघायले मिळाले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gangster siddhesh abhange released from nashik road jail marathi news