लसूण, बटाट्याचे दर कडाडले! भाजीपाल्यांच्या दरात मात्र घसरण 

रवींद्र मोरे
Wednesday, 11 November 2020

पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याचे दर कोसळलेलेच राहिल्यानंतर रब्बी हंगाम सुरू झाला. तरीही भाजीपाल्यांच्या दरात वाढ नसली तरी बटाटा व लसूणचे भाव मात्र वाढलेले आहेत. गहू या पीकातही गेल्या वर्षीपेक्षा हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना यंदा बसलेला आहे.

बिजोरसे (जि.नाशिक) : पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याचे दर कोसळलेलेच राहिल्यानंतर रब्बी हंगाम सुरू झाला. तरीही भाजीपाल्यांच्या दरात वाढ नसली तरी बटाटा व लसूणचे भाव मात्र वाढलेले आहेत. गहू या पीकातही गेल्या वर्षीपेक्षा हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना यंदा बसलेला आहे. त्यामुळे कोणते पीक घ्यावे, या विवंचनेत शेतकरी आहेत. लसूण व बटाटा हे पण मोजकेच शेतकरी उत्पादन घेतात.

नामपूर, काटवन परिसरात भाजीपाल्यांच्या दरात मात्र घसरण ​

नाशिक जिल्हा द्राक्षे व कांद्यासाठी नावाजलेला; पण यंदा पावसामुळे अर्ली द्राक्षांवर फवारणी करून शेतकरी मेटाकुटीस आला. तसेच कांद्याच्या भावात चढ-उतार जास्त दिवस झाल्याने कांदा सडला. त्यामुळे दोन पैसे मिळतील, ही अपेक्षाही फोल ठरली. दुसऱ्या राज्यातून बटाटा आयात केला जातो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरात या ठिकाणीही पाऊस जास्त झाल्याने बटाटा उत्पादनात घट झाल्याने भाव त्याचे जास्त आहेत. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

वीस वर्षांत पहिल्यांदाच ५० रुपये किलो

आज लसूणचे भाव २२० रुपये किलो व बटाटा वीस वर्षांत पहिल्यांदाच ५० रुपये किलो दराने मिळत आहे. रब्बी हंगामात कसमादे पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदा पाऊस उशिरा आल्यामुळे लागवड उशिरा झाली. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन कोथिंबीर व मेथीचे भाव स्थिर आहेत. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

 

गेल्या काही वर्षांपासून आम्ही टोमॅटोचे उत्पादन घेत आहोत. मात्र उत्पन्न जास्त असल्याने दर घसरले आहेत. औषध फवारणीचे पैसे निघणे कठीण झाले आहे. कोणत्याच मालाची शाश्‍वती नाही व सरकारने हमीभाव द्यावा. -वसंत मोरे, शेतकरी  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garlic and potato prices have increased nashik marathi news