esakal | राजस्थानमधून फूस लावत युवतीला लासलगावला आणले..अन् तिच्यासोबत गुपचूप काम केले..
sakal

बोलून बातमी शोधा

rajsthani girl.jpg

राजस्थानमधील झुन्झुनू येथील एक्‍सलेंट कोचिंग क्‍लासमधील 19 वर्षीय तरुणीस 10 फेब्रुवारी 2020 ला संशयित मुकेश जोशराम लोरा याने फूस लावत पळवून आणले होते. युवतीचे अपहरण झाल्याचे समजताच या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. यानंतर संशयित मुकेशने या युवतीकडून त्याने बरीच कामे करून घेतली..

राजस्थानमधून फूस लावत युवतीला लासलगावला आणले..अन् तिच्यासोबत गुपचूप काम केले..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / लासलगाव : राजस्थानमधील झुन्झुनू येथील एक्‍सलेंट कोचिंग क्‍लासमधील 19 वर्षीय तरुणीस 10 फेब्रुवारी 2020 ला संशयित मुकेश जोशराम लोरा याने फूस लावत पळवून आणले होते. युवतीचे अपहरण झाल्याचे समजताच या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. यानंतर संशयित मुकेशने या युवतीसोबत जे काही घडले ते धक्कादायक होते.. 

असा घडला प्रकार

राजस्थानमधील झुन्झुनू येथील एक्‍सलेंट कोचिंग क्‍लासमधील 19 वर्षीय तरुणीस 10 फेब्रुवारी 2020 ला संशयित मुकेश जोशराम लोरा याने फूस लावत पळवून आणले होते. युवतीचे अपहरण झाल्याचे समजताच या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. यानंतर संशयित मुकेशने या युवतीस संगमनेर येथे आणत त्यांनी काही काळ तेथे काम केले. नंतर खडकमाळेगाव येथील शिंदे यांच्या पोल्ट्रीफार्मवर पती-पत्नी असल्याने सांगून काम करत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते या ठिकाणी काम करत होते. या मुलीचे अपहरण झाले असल्याची गुप्त माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलिस उपनिरीक्षक आर. एस. सोनवणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जोपळे, पोलिस नाईक कैलास महाजन, प्रदीप आजगे, महिला पोलिस जाधव यांनी या दोघांना ताब्यात घेतले. आपण दोघे पती-पत्नी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन

राजस्थानमधून फूस लावत अपहरण केलेल्या युवतीस लासलगाव पोलिसांनी खडकमाळेगाव (ता. निफाड) येथून ताब्यात घेत संशयितास अटक करून त्यांना राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले. लासलगाव पोलिसांनी झन्झुनू पोलिस ठाण्यात संपर्क साधत या अपहरणाची माहिती दिली. यानंतर राजस्थान पोलिसांचे एक पथक अपहरण झालेल्या युवतीच्या कुटुंबीयांसमवेत लासलगावला आल्यानंतर या दोघांना लासलगाव पोलिसांनी त्यांच्या स्वाधीन केले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त