धक्कादायक! व्यंगासोबत जगणं मान्य नव्हतं म्हणून तिने जीवनयात्राच संपविली; कुटुंबियांमध्ये हळहळ

नंदकुमार दिनगोरे
Friday, 18 September 2020

एकीकडे सर्वसामान्यांपेक्षा ‘विशेष’ असल्यामुळे नेहमीच लोकांची सहानुभूती आणि चर्चेचा विषय राहिलेले दिव्यांग आपल्या सर्जनात्मक कलाकौशल्यातून आम्ही खरंच ‘विशेष’ आहोत हे वेगवेगळ्या कृतीतून सिद्ध करत असतात. तसेच आपल्या व्यंगावर मात करत स्वयंरोजगाराकडे वाटचाल करत आहेत. आणि दुसरीकडे मात्र १२ वर्षीय मुलीने व्यंगाला कंटाळून अखेरचे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक / मोहाडी : एकीकडे सर्वसामान्यांपेक्षा ‘विशेष’ असल्यामुळे नेहमीच लोकांची सहानुभूती आणि चर्चेचा विषय राहिलेले दिव्यांग आपल्या सर्जनात्मक कलाकौशल्यातून आम्ही खरंच ‘विशेष’ आहोत हे वेगवेगळ्या कृतीतून सिद्ध करत असतात. तसेच आपल्या व्यंगावर मात करत स्वयंरोजगाराकडे वाटचाल करत आहेत. आणि दुसरीकडे मात्र १२ वर्षीय मुलीने व्यंगाला कंटाळून अखेरचे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

आई-वडिल घरी परतताच बसला धक्का...

मोहाडी येथील थोरात विद्यालयात सहावीत शिकत असलेल्या १२ वर्षीय भगवती सतीश पाटील या विद्यार्थिनीच्या वडिलांचा यांचा कटलरीचा व्यवसाय असल्याने आई-वडील गुरुवारी घराबाहेर गेले होते. ते घरी परतताच त्यांना जे दृश्य दिसले ज्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यांची लेक भगवतीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. जन्मताच भगवतीचे ओठ चिरलेले होते. शस्त्रक्रिया करूनदेखील पडजिभेचा तिला त्रास होत होता. त्यामुळे बोलताना तोतरे बोलायची. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली, अशी मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

व्यंगाला कंटाळून राहत्या घरात गळफास

थोरात विद्यालयात सहावीत शिकत असलेल्या १२ वर्षीय भगवती सतीश पाटील या विद्यार्थिनीने व्यंगाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी (ता. १६) सकाळी अकराला ही घटना घडली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl commits suicide in Mohadi nashik marathi news