मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

leopard night 1.jpg
leopard night 1.jpg

वाडीव-हे / नाशिक :  आदिवासी, कातकऱी समाज गावाच्या बाहेर राहतात. घरे कमकुवत असतात. बरेचसे लोकं उघड्यावर घरासमोर झोपतात. अस्मानी, सुलतानी संकटात तर कधी हिंस्र श्वापदाच्या हल्यात ते बळी जातात. अशीच एक ह्रदय हेलावणारी घटना आधारवड शिवारात घडली आहे. मामाने आपल्या भाचीला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्याचे प्रयत्न केले..पण काळाची चाहूल आली आणि ते अपयशी ठरले..

मामाने वाचवले पण नियतीने हिरावले

आधरवड शिवारात रात्रीच्या वेळी बिबट्याने 3 वर्षाच्या जया चवर या बालिकेवर हल्ला करून फरफटत नेत असताना तिच्या मामाने बिबट्याच्या जबड्यातुन सोडवले होते. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेत तिला डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तब्बल ६ दिवस तिची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. रात्री 12 वाजता जया चवरचा मृत्यु झाला. या महिन्यात चिचलेखैरे, कुरूगवाडी, आधरवड येथे बिबट्याच्या हाल्यात मृत्यु झालेल्याची ही तिसरी घटना आहे. इतक्या घटना घडल्या तरी बिबट्या पकडण्यात वन विभागाला अपयश आले आहे.

आधरवड ता.इगतपुरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालिकेचा रूग्नालयात ऊपचार सुरू आसताना मृत्यु झाला आहे. बिबट्या त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यानी केली आहे.

इगतपुरी तालुक्यात एकही प्रशिक्षीत वन कर्मचारी नाही. त्यामुळे बिबट्याला पकडणे व त्याचा बंदोबस्त कसा होणार, तोपर्यत हे बळी जाऊ द्यायचे का? बिबट्यांच्या बदोबस्तासाठी तात्काळ प्रशिक्षित अधिका-याची नेमणूक करावी इतक्या गंभीर घटना घडून देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. यापुढे परत अशी दुर्दैवी घटना घडली तर श्रमजीवी संघटना वन विभागाला माफ करणार नाही.- भगवान मधे, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा श्रमजीवी सघटना.
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com