निष्पाप चिमुकल्या पायलचा दुर्देवी अंत; अंगावर काटा आणणारी घटना

दिपक आहिरे
Thursday, 24 September 2020

पाच वर्षांची चिमुरडी पायल बत्तीशे...त्या चिमुरडीला माहितही नसावं की तिची काही चुक नसताना तिच्यासोबत क्रूर प्रकार घडणार आहे. काय घडले वाचा..

नाशिक / पिंपळगाव बसवंत : पाच वर्षांची चिमुरडी पायल बत्तीशे...त्या चिमुरडीला माहितही नसावं की तिची काही चुक नसताना तिच्यासोबत क्रूर प्रकार घडणार आहे. काय घडले वाचा..

निष्पाप पायलचा दुर्देवी अंत..

शहरातील मातंग वाड्यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत पथदीप उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबाला पावसामुळे वीजप्रवाह उतरला होता. याच वेळी पायल खांबाच्या आसपास खेळत असताना तिचा विजेच्या खांबाला हात लागला असता शॉक बसून तिचा मृत्यू झाला. दिवाबत्तीसाठी उभारण्यात आलेल्या विजेच्या खांबाचा शॉक लागून पाचवर्षीय चिमुरडीचा बुधवारी (ता. २३) दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील मातंगवाड्यात ही घटना घडली. पायल मधुकर बत्तीशे असे मृत चिमुकलीचे नाव आहे.या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा > "अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

तो खांब ठरतोय जीवघेणा... 
गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याच विद्युत दिवाबत्तीच्या खांबाचा एका पाळीव शेळीला शॉक लागल्याची घटना घडली. सुदैवाने ती शेळी बचावली परंतु ती घटना गांभीर्याने न घेतल्याने पुन्हा त्याच विजेच्या खांबाचा शॉक बसून पाचवर्षीय चिमुरडीचा निष्पाप बळी गेल्याची भावना परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी करत व्यक्त केली. शहरात अनेक विजेचे खांब धोकादायक स्थितीत आहेत. ग्रामपंचायत व वीज वितरण विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl dies in Pimpalgaon due to shock nashik marathi news