मातेचा आक्राेश.. दुसऱ्यांदा हिरावला कन्यारत्न प्राप्तीचा आनंद .. बिबट्याचा ४ वर्षीय चिमुरडीवर हल्ला..

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 17 June 2020

गुंजन दशरथ नेहेरे (वय 4) असे या चिमुरडीचे नाव असून, बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या आईसोबत ती येथे आलेली आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या संबंधित आईला नुकतीच मुलगी झालेली आहे. त्यामुळे एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे पहिल्या मुलीचा बिबट्याने घेतलेला बळी, अशा अवस्थेत ही माता आहे

नाशिक रोड : गुंजन दशरथ नेहेरे (वय 4) असे या चिमुरडीचे नाव असून, बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या आईसोबत ती येथे आलेली आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या संबंधित आईला नुकतीच मुलगी झालेली आहे. त्यामुळे एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे पहिल्या मुलीचा बिबट्याने घेतलेला बळी, अशा अवस्थेत ही माता आहे

बिबट्याच्या हल्ल्याने सर्वच उध्दवस्त

नाशिक रोडपासून अवघ्या सहा किलोमीटरवरील बाभळेश्‍वर येथील श्रीपत मुरलीधर टिळे यांच्या घराच्या मागील बाजूस राजू शिंगाडे यांच्या अंगणात सायंकाळी सातच्या सुमारास गुंजन आणि आणखी दोन मुले खेळत होते. त्यावेळी शाळेच्या बाजूने आलेल्या बिबट्याने गुंजनवर हल्ला करून दोनशे मीटरवर उसाच्या शेतात ओढून नेले. त्यामुळे भयभीत कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर शोध सुरू झाला. सरपंच मंगला पगारे, ग्रामपंचायत सदस्य श्रीपत टिळे, साहेबराव टिळे, पोलिसपाटील साहेबराव बटाव, ग्रामसेवक ज्ञानेश्‍वर भोर आदींसह ग्रामस्थांनी उसाच्या शेतात शोध घेतला असता, तिचा मृतदेह आढळून आला. बिबट्याने गळ्याजवळ गंभीर जखम केल्याने या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. 

मातेचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

दोनवाडे येथील वृद्धास बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा बाभळेश्‍वर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चारवर्षीय बालिका ठार झाली आहे. गुंजन दशरथ नेहेरे (वय 4) असे या चिमुरडीचे नाव असून, बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या आईसोबत ती येथे आलेली आहे. खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या संबंधित आईला नुकतीच मुलगी झालेली आहे. त्यामुळे एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे पहिल्या मुलीचा बिबट्याने घेतलेला बळी, अशा अवस्थेत ही माता आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, वन विभागाने येथे पिंजरा लावावा, आशा मागणी होत आहे.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

वन विभागाने पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी

यापूर्वीही बिबट्याने दोनवाडे, पळसे, हिंगणवेढे शिवारातही लहान मुलांवर व वृद्धावर हल्ला केला आहे. या परिसरातील बिबट्या नरभक्षक झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यापूर्वी गावात बिबट्या दिसला तेव्हाच येथे पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली होती; परंतु वन विभागाच्या कार्यक्षेत्रात 64 गावे व पिंजरे केवळ पाचच आसल्याने पिंजरा उपलब्ध झालेला नाही.  

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl was killed in leopard attack Babhaleshwar nashik marathi news