esakal | ''विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या''; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

maratha samaj.jpg

मराठा आरक्षणप्रश्नी दोन दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना विशेष अधिवेशन व आरक्षणप्रश्नी पुनर्याचिका दाखल करण्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे करण्यात आली.

''विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या''; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना निवेदन

sakal_logo
By
संदीप मोगल

नाशिक / लखमापूर : मराठा आरक्षणप्रश्नी दोन दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना विशेष अधिवेशन व आरक्षणप्रश्नी पुनर्याचिका दाखल करण्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे करण्यात आली. याप्रश्‍नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आरक्षण पुन्हा कायम कसे राहील, योग्य तोडगा कसा काढता येईल यासाठी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन झिरवाळ यांनी दिले. 

मागण्यांसंदर्भात विशेष दोनदिवसीय अधिवेशन घ्यावे
दोन दिवसांत सर्वपक्षीय विचारसरणी बाजूला ठेवून, मराठा समाजाच्या मदतीची जाणीव ठेवून, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात विशेष दोनदिवसीय अधिवेशन घ्यावे व सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती याबाबत पुनर्याचिका लवकरात लवकर दाखल करावी. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

मराठा युवकांना न्याय द्यावा; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना निवेदन

यांसह चालू शैक्षणिक वर्षात वैद्यकीय, उच्च शिक्षण व इतर शालेय वर्गांसाठी मराठा आरक्षण रद्द करू नये, यापूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश व नोकरभरती संदर्भातील आरक्षण जशास तसे ठेवून वटहुकूम काढून मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा व मराठा युवकांना न्याय द्यावा, मराठा समाजातील विद्यार्थी शिक्षण व नोकरीपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी करण्यात आली. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO


या वेळी सोमनाथ जाधव, गंगाधर निखाडे, रवींद्र जाधव, शिवाजी पिंगळे, मंगेश जाधव, विनायक शिंदे, अमरसिंह राजे, नितीन देशमुख, भगवान गायकवाड, विक्रम मवाळ, किशोर देशमुख, जयदीप देशमुख, विशाल देशमुख, राहुल जाधव, लखन पिंगळे, सीताराम गणोरे, गोविंद निमसे, नामदेव निखाडे, महेश ठुबे, ज्ञानेश्वर गडाख, आबा शिंदे आदी उपस्थित होते. 

संपादन - ज्योती देवरे