esakal | एअर इंडियात नोकरीला लावणाऱ्या 'बॉबी'ची करामत! १८ जणांना रातोरात गंडविले
sakal

बोलून बातमी शोधा

fraud check.jpg

सुप्रिया दुबे या नवी दिल्लीतील एजीटी संस्थेत सेवेत असताना तेथे सुमंत कोलांती ऊर्फ बॉबी कोलांती याच्यासोबत ओळख झाली. कोलांती याने एअर इंडियात सेटस ग्राउंड स्टाफ म्हणून अनेकांना नोकरी लावल्याचे दुबेंना सांगितले. त्यावर दुबेंनेही विश्वास ठेवला. पण त्यानंतर असे घडले ज्याने सर्वांनाच धक्का बसला.

एअर इंडियात नोकरीला लावणाऱ्या 'बॉबी'ची करामत! १८ जणांना रातोरात गंडविले

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : सुप्रिया दुबे या नवी दिल्लीतील एजीटी संस्थेत सेवेत असताना तेथे सुमंत कोलांती ऊर्फ बॉबी कोलांती याच्यासोबत ओळख झाली. कोलांती याने एअर इंडियात सेटस ग्राउंड स्टाफ म्हणून अनेकांना नोकरी लावल्याचे दुबेंना सांगितले. त्यावर दुबेंनेही विश्वास ठेवला. पण त्यानंतर असे घडले ज्याने सर्वांनाच धक्का बसला.

असा घडला प्रकार

सुप्रिया दुबे या नवी दिल्लीतील एजीटी संस्थेत सेवेत असताना तेथे सुमंत कोलांती ऊर्फ बॉबी कोलांती याच्यासोबत ओळख झाली. कोलांती याने एअर इंडियात सेटस ग्राउंड स्टाफ म्हणून अनेकांना नोकरी लावल्याचे सांगून मार्च २०१८ ला एअर इंडिया सेटस ग्राउंड स्टाफमध्ये व्हॅकन्सी असून, एव्हिएशन ॲकॅडमीतर्फे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन २५ हजार रुपये प्रोसेसिंग शुल्कापोटी नोंदणी केली. त्यानंतर वेळोवेळी सुप्रिया दुबे यांना दोन लाख ३० हजाराला गंडविले.

सात बेरोजगारांचे साडेतीन लाख रुपये

दुबे यांचा मुंबईतील मित्र सुशांत हा कन्सलटन्सी व्यवसाय करतो. त्यांच्याकडील १८ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे नऊ लाख रुपये बॉबी कोलांती याच्या खात्यात ट्रान्सफर केले. दुबे यांची दिल्लीतील मैत्रीण मोनिका ही सेलीबिनाज एअरपोर्ट येथे मॅनेजर असून, तीनेही सात बेरोजगारांचे साडेतीन लाख रुपये दुबे यांच्या खात्यावर पाठवले. ती रक्कम देखील दुबे यांनी कोलांती यांच्या खात्यावर वर्ग केली. 

बॉबी कोलांतीचे सगळे मोबाईल क्रमांक बंद
कोलांतीने ऑगस्ट २०१८ मध्ये तुमचे नोकरीचे काम होईल, असे सांगितले. मात्र, तेव्हा काम झाले नाही. काम डिसेंबर २०१८ मध्ये होईल, असे त्याने पुन्हा सांगितले. मात्र, तेव्हाही काम झाले नाही. तेव्हा फेब्रुवारी २०१९ मध्ये काम होईल, असे आश्वासन दिले. तेव्हाही निराशा हाती आल्यावर या सर्वांनी कोलांती याला फोन लावला तो बंद होता. काही दिवसांनी कोलांतीने सुप्रिया दुबे यांना श्रीलंकेतून फोन करून मी स्वतःच्या लग्नासाठी श्रीलंकेत आलो असून, परतल्यावर पैसे देतो, असे सांगितले. पत्नीच्या व्हीजाची अडचण आहे, असे सांगून कोलांतीने २९ जुलै २०१९ ला आणून देतो, असे सांगितले. तथापी, त्यानंतर कोलांतीचे सगळे मोबाईल क्रमांक बंद केल्याने त्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. सुमंत कोलांती (रा. एलंखा ओल्ड टाउन, व्यंकटा मूर्तीनगर, २४ कास) व रघवेंद्र निलाया (रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

फसवणुकीचा गुन्हा दाखल

बेरोजगारांना नोकरीच्या आमिषने १५ लाखाला गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आर्थिक फसवणूकप्रकरणी सुप्रिया पंकज दुबे (सद्‍गुरू रेसिडेन्सी, उपनगर) यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.