esakal | डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटले चक्क अडीज लाखांचे दागिने...दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी..!
sakal

बोलून बातमी शोधा

gold-.jpg

 ज्वेलर्सचे मालक मोरे हे दुकान बंद करुन मालेगावी येत असताना सायंकाळी कारने मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात ते खाली पडून जखमी झाले. ही संधी साधून संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली अन्.. 

डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटले चक्क अडीज लाखांचे दागिने...दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनाराला लुटल्याच्या आरोपावरुन दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी   
सोनाराला लुटल्याच्या आरोपावरुन
दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : ज्वेलर्सचे मालक मोरे हे दुकान बंद करुन मालेगावी येत असताना सायंकाळी कारने मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात ते खाली पडून जखमी झाले. ही संधी साधून संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली अन्..

काय घडले नेमके?

या खटल्याची माहिती अशी, मोरे ज्वेलर्सचे मालक उमेश मोरे हे दुकान बंद करुन मालेगावी येत असताना 21 जानेवारी 2017 ला सायंकाळी सातच्या सुमारास सुनील वाघ व अमोल जाधव यांच्या कारने मोरे यांच्या दुचाकीला वडनेर शिवारात धडक दिली. अपघातात ते खाली पडून जखमी झाले. ही संधी साधून संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून दोन लाख 35 हजाराचे दागिने लुटले. रस्त्याने जाणाऱ्या काहींनी कारचा पाठलाग करुन एका संशयिताला अटक केली. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप बोरसे व सहकाऱ्यांनी तपास केल्यानंतर लुट व सोने विक्रीचा कट असल्याचे निदर्शनास आले.

रस्ता लुट, कट केल्याचा गुन्हा दाखल

त्यानंतर या गुन्ह्यात दोघा प्रमुख आरोपींसह निलेश राऊत, प्रशांत सरदेसाई, अभय वाघ, अमोल राजधर (सर्व रा. नाशिक) यांच्याविरुध्द वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात रस्ता लुट, कट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. लुटीचे सोने सुनील व अमोल यांच्या ताब्यात मिळून आले. या खटल्याचे कामकाज न्यायाधीश गांधी यांच्या समोर चालले. खटल्याचे कामकाज सुरु असताना फिर्यादी व साक्षीदारांनी न्यायालयाबाहेर तडजोड केली. साक्षीदार फितुर झाले असताना सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट संजय साेनवणे यांनी कामकाज करताना रस्ता लुट व दरोड्यात लुटलेले सोने दोघा मुख्य आरोपींकडून मिळून आल्याने गुन्हा सिध्द झाल्याचा युक्तीवाद केला. युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश गांधी यांनी दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अन्य चौघा संशयितांना निर्दोष मुक्त करण्यात आले. ॲडव्हाेकेट सोनवणे यांना खटल्याच्या कामकाजात हवालदार किशोर दळवी यांनी सहकार्य केले.  

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

वडनेर खाकुर्डी येथील मोरे बंधु ॲन्ड ज्वेलर्सचे मालक उमेश मोरे (रा. मालेगाव) दुकान बंद करुन मालेगावी परततांना त्यांच्या दुचाकीला कारची धडक देत मिरची पुड टाकून दोन लाख 35 हजार रुपये किंमतीचे सोने लुटल्याच्या आरोपावरुन सुनील वाघ (रा. शिपाई कॉलनी, सोयगाव) व अमोल जाधव (रा. पंचवटी नाशिक) या दोघांना पाच वर्षे सक्त मजुरी व पंचवीस हजार रुपये दंड सुनावण्यात आला. या गुन्ह्यातील अन्य चौघा संशयितांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अपर जिल्हा सत्र न्यायाधिश अनिरुध्द गांधी यांनी हा निकाल दिला.

हेही वाचा >  "आता मुख्यालयीच थांबा.. अन्यथा.." सरकारी बाबूंकडुनच नागरिकांना भीती